Download App

बॅरिकेड्स तोडले, ट्रकवर चढले; दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन, ‘या’ आहेत प्रमुख मागण्या…

Farmers March Noida To Delhi Parliament Today : नव्या कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळावी, या प्रमुख मागणीसाठी नोयडामधील आंदोलक शेतकऱ्यांनी (Farmers March) दिल्लीकडे कूच केलीय. मागण्या पूर्ण न झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा ‘दिल्ली मार्च’च्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचे नियोजन केलंय. नोएडातील संतप्त शेतकऱ्यांनी आज मोठ्या संख्येने दिल्लीकडे मोर्चा (Farmers Protest) काढलाय. काल शेतकरी आणि प्राधिकरण यांच्यात सुमारे 3 तास बैठक सुरू होती. मात्र, या बैठकीत कोणताही निकाल लागला नाही, त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी 2 डिसेंबरला दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. गोरखपूरच्या चारपट नुकसानभरपाई, भूसंपादन कायद्याचे फायदे आणि 10 टक्के विकसित भूखंड या मागण्यांची अंमलबजावणी करणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

संपूर्ण राज्याच्या तुलनेत गौतम बुद्ध नगरातील भूसंपादनाच्या 4 पट मोबदला देण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. गेल्या 10 वर्षात न वाढलेले सर्कलचे दरही वाढवावेत, यासोबतच 10 टक्के विकसित भूखंड देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत (Sanyukt Kisan Morcha Protest) आहे. जबलपूर आणि हरियाणाच्या सीमावर्ती भागातील शंभू आणि खनौरी सीमेवर 6 डिसेंबरला शेतकरी नेते दिल्लीकडे कूच करणार असल्याचीही माहिती आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली आणि एनसीआरमध्ये वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या 132 जागा, त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच; छगन भुजबळांनी क्लिअर सांगितलं…

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झालीय. शेतकऱ्यांच्या खासदार आणि जंतरमंतर मोर्चाबाबत दिल्ली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दिल्लीच्या कालिंदी कुंजमध्ये सकाळपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. मात्र, पोलिसांकडून येथे सातत्याने बॅरिकेड्स लावून तपासणी सुरू आहे. अधिक प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आलाय. वाहतूक कोंडीत वाहनधारक अडकले आहेत. दिल्ली सीमेवर चार हजार जवान तैनात आहेत. महामाया उड्डाणपुलाजवळही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीय.

50 दिवसांचा यशस्वी टप्पा पूर्ण; ‘फुलवंती’ने साजरी केली सक्सेस पार्टी

यमुना प्राधिकरण कार्यालयासमोर शेतकरी चार दिवसांपासून बेमुदत संपावर बसले होते, मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता शेतकरी दिल्लीत संसदेला घेराव घालण्याच्या तयारीत आहेत. पोलिस, जिल्हा दंडाधिकारी, ग्रेटर नोएडा प्राधिकरण, नोएडा प्राधिकरण आणि यमुना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या. मात्र, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीकडे कूच करणार असून आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले.

 

follow us