Download App

पुन्हा शेतकरी आंदोलन, 14 डिसेंबरला दिल्लीला जाणार, शेतकरी संघटनेची घोषणा

Farmer Protest : देशाची राजधानी दिल्लीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार पुन्हा एकदा लाखोंच्या संख्यने शेतकरी दिल्लीकडे कूच

  • Written By: Last Updated:

Farmers Protest: देशाची राजधानी दिल्लीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार पुन्हा एकदा लाखोंच्या संख्यने शेतकरी दिल्लीकडे (Delhi) कूच करण्याच्या तयारीत आहे. शेतकरी नेते सरवनसिंह पंढेर (Sarwansingh Pandher) यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध मागण्यासाठी शेतकरी 14 डिसेंबरला पुन्हा मोर्चा काढणार आहेत. शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी संभू सीमेवरून ही घोषणा केली.

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच शेतकरी संघटनांना (Farmers Protest) सर्वोच्च न्यायालयातून (Supreme Court) दणका बसला होता मात्र पुन्हा एकदा शेतकरी दिल्लीकडे मोर्चा काढणार असल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

याबाबत पत्रकार परिषदेमध्ये माहिती देत शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर म्हणाले की, आमच्या आंदोलनाला 303 दिवस झाले असून तर आमचे आमरण उपोषण 15 व्या दिवसात पोहोचले आहे मात्र आजपर्यंत सरकारने आमच्याशी संपर्क साधला नाही.

दक्षिण आफ्रिकेचा विजय अन् भारताची धाकधूक वाढली, जाणून घ्या WTC Final साठी नवीन समीकरण

आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी अशी मागणी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शेतकरी नेते सरवनसिंह पंढेर यांनी केली तसेच चित्रपट कलाकार आणि धार्मिक नेत्यांना त्यांच्या अभिनयाची प्रसिद्धी आणि समर्थन करण्याचे आवाहन देखील पत्रकार परिषदेमध्ये शेतकरी सरवनसिंह पंढेर यांनी केला.

मोठी बातमी! कुर्ला अपघात, चालक संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

follow us