Download App

शहरी भागात एक कोटी घऱांची निर्मिती करणार; अर्थमंत्री अर्थसंकल्प निर्मला सीतारामण यांची घोषणा

लोकसभेत अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी शहरांसाठीही काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये नवीन घरांचा समावेश आहे.

  • Written By: Last Updated:

Union Budget 2024 : लोकसभेत अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत आहेत. (Union Budget) यामध्ये त्यांनी शहरासाठी काही घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये शहरांचा अत्यंत कल्पकतेने पुनर्विकास करण्यावर सरकारचा भर असेल असं त्या म्हणाल्या आहेत. शहरांचा विकास ग्रोथ हब म्हणून होणार. तसंच, ३० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या १४ शहरांचा विशेषत्वाने विकास होणार असंही सीतारामण म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर शहरी भागात एक कोटी घऱांची निर्मिती केली जाईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

आंध्र प्रदेशला स्पेशल पॅकेजची  घोषणा; चंद्रबाबू नायडूंना दिलेला शब्द PM मोदींनी पाळला

३० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शंभर मोठ्या शहरांमध्ये मुलभूत सुविधांसाठी विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा समावेश आहे. शहरी विकासाच्या योजनांचा लाभ १ कोटी मध्यमवर्गीय कुटुंबियांना होणार आहे. यासह निवडक शहरांमध्ये स्ट्रीट फूड हब उभे केले जाणार आहेत. यामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासावर मोदी सरकारने भर दिला असून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बत ११ लाख कोटी रुपये देण्यात येणार आहेत. जीडीपीच्या ३.४ टक्के खर्च पायाभूत सुविधांवर होणार आहे.

follow us