Union Budget LIVE : स्टॅडर्ड डिडक्शन वाढवले; न्यू रिजीममध्ये किती भरावा लागणार टॅक्स

  • Written By: Published:
Union Budget LIVE : स्टॅडर्ड डिडक्शन वाढवले; न्यू रिजीममध्ये किती भरावा लागणार टॅक्स

Union Budget 2024 LIVE Update: नवी दिल्ली : केंद्रातील एनडीए सरकारचा तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प (Union Budget 2024) आज (23 जुलै) सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला आहे. यात शेती, पायाभूत सुविधांसह अनेक गोष्टींबाबत मोठ मोठ्या घोषणा करण्यात आल्या  आहेत. सीतारामन यांनी कुणासाठी काय घोषणा केल्या याबाबत सविस्तर माहिती देणार ब्लॉग…

 

LIVE NEWS & UPDATES

  • 23 Jul 2024 12:30 PM (IST)

    अर्थसंकल्पात आयकरावर मोठी घोषणा, स्टॅडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवली

    स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारांवरून ७५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे.  अर्थसंकल्पात करप्रणालीबाबत करण्यात आलेल्या घोषणांनुसार 3 ते 7 लाखांपर्यंत पाच टक्के आयकर, 12 ते 15 लाखांवर 20 टक्के तर, 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के आयकर द्यावा लागणार आहे.

    न्यू रिजीममध्ये कसा असेल टॅक्स स्लॅब

    • 0-3 लाखांच्या उत्पनावर शून्य टक्के टॅक्स
    • 3 ते 7 लाखांवर 5 टक्के टॅक्स
    • 7 ते 10 लाखांवर 10 टक्के टॅक्स
    • 10-12 लाखांच्या उत्पानावर 15 टक्के टॅक्स
    • 12-15 लाखांच्या उत्पानावर 20 टक्के टॅक्स
    • 15 लाखांपेक्षा अधिक उत्पानावर 30 टक्के टॅक्स

  • 23 Jul 2024 12:22 PM (IST)

    सोनं-चांदीवरील कस्टम ड्युटी घटवली

    अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी सोनं, चांदी व प्लॅटिनमवरीव कस्टम ड्युटी कमी  करण्याची घोषणा केली आहे. सोने आणि चांदीसाठी 6 तर, प्लॅटिनमसाठी 6.5 टक्के कस्टम ड्युटी कमी करण्यात आल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

  • 23 Jul 2024 12:13 PM (IST)

    मोबाईल फोन-चार्जरसह तीन कॅन्सरची औषधे स्वस्त होणार

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोबाईल आणि चार्जरवरील कस्टम ड्यूटी 15 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे येत्या काळात मोबाईल आणि चार्जरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय कॅन्सरची तीन औषधे कस्टम ड्युटी फ्री करण्यात आल्याने याच्या किमती कमी होणार असल्याने रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटी 6 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच लिथियमवरील कस्टम ड्यूटीदेखील कमी करण्यात आली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने आणखी स्वस्त होणार आहेत.

    काय स्वस्त होणार?

    मोबाईल हॅन्डसेट

    मोबाईल चार्जर

    कॅन्सरवरील औषधे

    सोने आणि चांदीचे दागिणे

    इलेक्ट्रिक वहाने

    सोलार सेट

  • 23 Jul 2024 12:03 PM (IST)

    बजेटमध्ये तरुणांसाठी काय?

    खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने ई-कॉमर्स निर्यात केंद्र तयार केले जाणार
    तरुणांच्या इंटर्नशिपसाठी सर्वसमावेशक योजना आणणार
    5 वर्षात टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप
    100 शहरांमध्ये औद्योगिक पार्क विकसित केले जातील.
    MSME हमी योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांपर्यंतची कर्जे उपलब्ध होणार
    MUDRA कर्ज मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली
    MSME ला मदत करण्यासाठी SIDBI शाखा वाढवणार
    देशात उच्च शिक्षणासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज देणार
    दरवर्षी 25000 विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात 7.5 लाखांचे कर्ज
    पहिल्या कामावर थेट EPFO ​​खात्यात 15 हजार रुपये दिले जाणार

  • 23 Jul 2024 11:59 AM (IST)

    नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येणार

    नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येणार असून, अशा प्रकारच्या सुविधांमधून नोकरदार वर्गामध्ये महिलांची संख्या वाढण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. सर्वांगीण विकासासाठी नॅशनल कोऑपरेशन पॉलिसी राबवली जाणार आहे.

  • 23 Jul 2024 11:56 AM (IST)

    देशातील 1 कोटी तरुणांना दिली जाणार इन्टर्नशीप, 12 महिन्यांसाठी मिळणार इन्टर्नशीप

    देशातील १ कोटी तरुणांना इन्टर्नशीप देण्यात येणार

    टॉपच्या कंपन्यात इन्टर्नशीप देण्यात येणार

    पुढच्या पाच वर्षांत १ कोटी तरुणांना देण्यात येणार इन्टर्नशीप

    १२ महिन्यांच्या कालावधीसाठी दिली जाणार इन्टर्नशीप

    इन्टर्नशीपच्या काळात तरुणांना अलाऊन्स म्हणून ५ हजार रुपये प्रतिमहिना मिळणार

    वन टाईम असिस्टन्स म्हणून ६ हजार रुपये दिले जाणार

  • 23 Jul 2024 11:53 AM (IST)

    पाटणा ते पुणे एक्सप्रेस वे ला मंजुरी

    अर्थसंकल्पात पाटणा ते पुणे एक्सप्रेस वे ला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय फेरीवाल्यांसाठी स्ट्रीट फूड हब तयार केले जाणार असून, निवडक शहरांमध्ये १०० स्ट्रीट फूड हब्जची योजना राबवली जाणार आहे. पंतप्रधान सौर यौजनेची घोषणा; एक कोटी लोकांना मोफत सौरउर्जा देण्याचा प्रयत्न. 100 शहरांमध्ये स्वच्छ पाणी योजना राबविण्याबरोबरच शहरातील गरिबांना घरासाठी 2.2 लाख कोटी रुपये देणार

  • 23 Jul 2024 11:44 AM (IST)

    महिला आणि मुलींच्या योजनांसाठी 3 लाख कोटींची तरतूद

    महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 हून अधिक शाखा ईशान्येकडील भागात स्थापन केल्या जाणार आहेत. याशिवाय देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलावरम सिंचन प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. 

  • 23 Jul 2024 11:41 AM (IST)

    सामान्यांच्या घरांसाठी मोठी घोषणा

    अर्थसंकल्पात घोषणा करताना सीतारामन यांनी सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तीन कोटी घरे बांधली जातील अशी घोषणा केली आहे. ही घरे पीएम आवास योजनेअंतर्गत बांधली जाणार आहेत.

  • 23 Jul 2024 11:39 AM (IST)

    १२ इंडस्ट्रियल पार्क उभारण्यात येणार...

    देशभरात 12 इंडस्ट्रियल पार्कला नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रॅमअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube