Download App

किरकोळ वादानंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठात फायरिंग; दोन कर्मचारी गोळी लागल्यानं जखमी

उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्यात फायरिंगच्या घटनेनं दहशत. विद्यापीठातील मेडिकल कॉलनीत किरकोळ वादानंतर गोळीबार.

  • Written By: Last Updated:

Firing at Aligarh Muslim University : अलिगढ मुस्लिम विद्यापीठात फायरिंग झाल्याची घटना समोर आली आहे. (Firing) उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्यात फायरिंगच्या घटना वाढल्या आहेत. (Aligarh ) विद्यापीठातील मेडिकल कॉलनीत किरकोळ वादानंतर रजिस्ट्रार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एकमेकांवर गोळीबार केला. यामध्ये गोळी लागल्यानं दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

अडचणी वाढल्यामुळे पूजा खेडकर फरार?, RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांच्याकडून हे गंभीर मुद्दे उपस्थित

जखमी कर्मचाऱ्यांना उपचारांसाठी जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आलं आहे. या घटनेनंतर पोलिसांचा फौजफाटा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाला आहे. नेमका वाद काय झाला? आणि बंदुका कर्मचाऱ्यांनी जवळ कशा बाळगल्या? याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

follow us