Smit Machchhar Flydubai Pilot:फ्लायदुबाईच्या FZ1073 विमानातील भारतीय पायलट कॅप्टन स्मित मछार (Smit Machchhar) यांच्यावर सहवैमानिकाने केलेल्या हल्ल्यानंतरचा धक्कादायक व्हिडिओ आता समोर आला आहे. गंभीर दुखापत झालेली असतानाही कॅप्टन स्मित यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिल्याचे या व्हिडिओमधून दिसून येते. या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनीही त्यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे.
किशोर आवारे हत्या प्रकरण: आरोपी चंद्रभान (भानू) खळदेचा जामीन रद्द; साक्षीदारांवर दबावाचा आरोप
दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या या विमानात प्रवासादरम्यान कॅप्टन स्मित यांच्यावर ओमानी सहवैमानिकाकडून हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतरच्या दृश्यांमध्ये त्यांच्या चेहऱ्यासह शरीरावर जखमा झाल्याचे दिसते. वेदना होत असूनही त्यांनी आपली शुद्ध हरवू नये, याची काळजी घेतल्याचे व्हिडिओतील संभाषणावरून दिसते.
“माझे डोके खूप दुखत आहे… मला एक उशी द्या, पण मला झोपायचे नाही. माझा हातही खूप दुखत आहे,” असे कॅप्टन स्मित व्हिडिओमध्ये म्हणताना ऐकू येतात. त्यांच्या प्रकृतीची गंभीर स्थिती लक्षात येत असतानाही विमानातील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत ते सतर्क असल्याचे यातून दिसते.
पुण्यातील आळंदीहून सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर बुडून दुर्दैवी मृत्यू
दरम्यान, हल्ला करणाऱ्या सहवैमानिकाला प्रवाशांनी पकडून ठेवले होते. एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, सहवैमानिकाने विमानावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा उद्देश पायलटला ठार करण्याचा होता.
घटनेनंतर विमानाला आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला. विमानाने सौदी अरेबियातील तबुककडे मार्ग बदलला. महत्त्वाची बाब म्हणजे, कॅप्टन स्मित यांनी तबुक विमानतळावर विमान लँड केले नाही. विमानात प्रवासी म्हणून असलेले फ्लायदुबाईचे दोन ऑफ-ड्युटी रिलीफ पायलट पुढे आले आणि त्यांनी कॉकपिटची जबाबदारी घेत विमानाचे तबुक येथे सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग केले.
विमान तबुकमध्ये पोहोचल्यानंतर कॅप्टन स्मित यांची अवस्था पाहून काही प्रवाशांनी त्यांच्या मदतीसाठी पोलिस आणि वैद्यकीय पथकाला बोलावण्याची मागणी केली. व्हिडिओमध्ये स्मित रक्ताने माखलेल्या अवस्थेत असले तरी शुद्धीत आणि संयमी दिसत आहेत.
इजिप्तमधून कांदा आयात सुरूच राहिल्यास रस्त्यावर उतरू, राजू शेट्टींचा सरकारला इशारा
यानंतर त्यांना स्ट्रेचरच्या मदतीने विमानातून बाहेर काढून तबुकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी ओमानच्या सहवैमानिकाने आपल्यावर अनेक वेळा वार केल्याचे सांगितले. हल्यामुळे आपल्याला चालता-फिरता येत असले तरी हाताची मूठ आवळता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
First Visual of Captain Smit Machchhar!
The Hero who saved the World…!!! #SmitMachchhar #Flydubai #IndianPilot #IndianPride #IndianHeroes #Aviation #AviationSafety #Courage #India #BreakingNews@narendramodi @PMOIndia @IsraeliPM @flydubai pic.twitter.com/Ut9gfifWnV— SOUVIK CHONGDER (@chongder_s51958) October 1, 2026
या घटनेनंतर कॅप्टन स्मित मछार यांच्या धैर्याची चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. तसेच हल्लेखोराला रोखण्यासाठी मदत करणाऱ्या विमानातील चार नागरिकांचा सन्मान करण्याचा निर्णय इस्रायलने घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
नेतन्याहू यांनी या घटनेबाबत गंभीर दावा करत सहवैमानिकाचा हेतू विमानाला अपघात घडवून आणण्याचा होता, असे म्हटले आहे. त्यांनी या घटनेची तुलना 9/11 सारख्या दहशतवादी कटाशी केली आहे.
