चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय (CM Vijay) यांनी आता जुन्या भ्रष्टाचारात प्रकरणात हात घातला आहे. तामिळनाडूचे माजी शालेय शिक्षणमंत्री अनबिल महेश पोय्यामोळी (Anbil Mahesh Poyyamozhi) यांना पोलिसांनी अटक केलीय. पोय्यामोळी हे डीएमके (DMK) सरकारमध्ये मंत्री होते. खासगी शाळांना सरकारी मान्यता आणि परवानग्या मिळवून देण्याच्या नावाखाली झालेल्या कथित 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणात ही अटक झालीय.
चेन्नई पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेने (CCB) सोमवारी ही कारवाई केलीय. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय. केंद्रीय गुन्हे शाखेचे पथक चेन्नईतील अमिंजिकाराई परिसरातील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचले आणि त्यांना अटक केली.
भीमाशंकरमधील वृक्षतोडीवरून ओमराजे निंबाळकर नाराज; सरकारला घरचा आहेर
नेमके प्रकरण काय?
तामिळनाडूमधील खासगी शाळांच्या संघटनांच्या महासंघाचे सचिव डी. सी. एलंगोवन यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणाची नोंद करण्यात आली होती. तक्रारीनुसार, बी. टी. अरसकुमार आणि मुथुकुमार या दोघांनी स्वतःला तामिळनाडू खासगी शाळा संघटनेचे अनुक्रमे संस्थापक-अध्यक्ष आणि खजिनदार असल्याचे सांगितले होते. मात्र, संबंधित संघटना नोंदणीकृत नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या दोघांनी खासगी शाळांच्या व्यवस्थापनांकडून 100 कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा केल्याचा आरोप आहे. शाळांना कायमस्वरूपी सरकारी मान्यता मिळवून देणे, शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी आवश्यक मंजुरी मिळवणे, नगररचना विभागाची (D परवानगी आणि इतर वैधानिक मंजुरी मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही रक्कम तत्कालीन सत्ताधारी द्रमुक (DMK) पक्षाच्या निधीसाठी असल्याचे सांगून जमा करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
आरोपी बी. टी. अरसकुमार याने सरकारी अधिकाऱ्यांशी आपले संपर्क असल्याचा दावा केला होता. या संपर्कांच्या माध्यमातून खासगी शाळांना आवश्यक परवानग्या मिळवून देता येतील, असे आश्वासन त्याने शाळा व्यवस्थापनांना दिल्याचा आरोप आहे. मात्र, आश्वासन दिल्यानंतरही संबंधित परवानग्या मिळवून देण्यात आल्या नाहीत आणि घेतलेली रक्कमही परत करण्यात आली नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.
आता मिसिंग लिंकवरील प्रवासासाठी नवीन नियम; वाहनांना वेग मर्यादा किती ?
आधी अरसकुमारला अटक, त्यानंतर मंत्र्यांची चौकशी
या प्रकरणात सुरुवातीला केंद्रीय गुन्हे शाखेने अरसकुमारविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार लाच स्वीकारणे किंवा लाचेची मागणी करणे आणि गुन्ह्यास प्रोत्साहन देणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 27 जून रोजी त्याला अटक करण्यात आली. पुढील तपासादरम्यान तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री अनबिल महेश पोय्यामोळी यांचा या प्रकरणातील कथित सहभाग तपासण्यास सुरुवात करण्यात आली.
नऊ ठिकाणी छापे; कागदपत्रे जप्त
16 सप्टेंबर रोजी केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकांनी चेन्नई आणि त्रिची येथील नऊ ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये अनबिल महेश यांच्याशी संबंधित चार ठिकाणांचाही समावेश होता. या कारवाईदरम्यान अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजीही अशाच प्रकारे शोधमोहीम राबवण्यात आली होती.या तपासाच्या पुढील टप्प्यात मद्रास उच्च न्यायालयाने अनबिल महेश यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
