Download App

महिलांना दोन हजार रुपये, 25 लाखांपर्यंत मोफत उपचार, विधानसभेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा

Haryana Election 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी (Haryana Election 2024) काँग्रेसने (Congress) आज

  • Written By: Last Updated:

Haryana Election 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी (Haryana Election 2024) काँग्रेसने (Congress) आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात काँग्रेसने सात महत्त्वाची आश्वासने दिली आहे. तसेच शेतकऱ्यांना MSP ची कायदेशीर हमी आणि जात सर्वेक्षण करण्याचे आश्वासन देखील काँग्रेसने दिले आहे.

तर दुसरीकडे या जाहीरनाम्यात काँग्रेसने वृद्ध, अपंग आणि विधवांना 6,000 रुपये मासिक पेन्शन देण्याचे आश्वासन देखील दिले आहे. तसेच 18 ते 60 वयोगटातील महिलांना मासिक 2,000 रुपये पेन्शन देण्याचे आश्वासन आणि प्रत्येक घराला 300 युनिट मोफत वीज आणि 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा देण्याचे आश्वासन काँग्रेसकडून हरियाणाच्या जनतेला देण्यात आले आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी खरगे म्हणाले, “आम्ही सात आश्वासन देत आहोत आणि ती आम्ही पूर्ण करू. याशिवाय आणखी अनेक आश्वासने आहेत ज्यांचा तपशील चंदीगडमध्ये जाहीर करण्यात आलेल्या 53 पानी जाहीरनाम्यात असेल. असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात एलपीजी सिलिंडरची किंमत 500 रुपयांपर्यंत मर्यादित, वृद्ध, विधवा आणि अपंगांना 6 हजार रुपये पेन्शन आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच 300 युनिट मोफत वीज आणि 25 लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिला आहे.

Puneet Balan : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला मोठ्या भक्तीभावाने निरोप 

90 विधानसभेच्या जागांसाठी 05 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे तर निवडणुकीचा निकाल 08 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपने 40 जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसला 31 जागांवर विजय मिळाला होता. तर नुकतंच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने 5-5 जागांवर विजय मिळावला होता.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ ला मंजुरी, मोदी मंत्रिमंडळात प्रस्ताव पास!

follow us