Download App

रेल्वे तिकीट ते युपीआय पेमेंट; 1 जुलैपासून नवे नियम लागू होणार..

रेल्वे तिकीट ते युपीआय पेमेंटमध्ये त्या 1 जुलैपासून नवे नियम लागू होणार असून या नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत.

UPI Payments : भारतात युपीआय पेमेंटपासून (UPI Payments) ते रेल्वेच्या तिकीटांपर्यंत (Train Ticket Booking) 1 जुलैपासून मोठ्य प्रमाणात बदल होणार आहेत. या बदलांचा परिणाम सामान्य माणसापासून ते व्यवसायापर्यंत सर्वांवर होणार आहे. यामध्ये UPI पेमेंट, पॅन कार्ड अर्ज, तत्काळ ट्रेन तिकीट बुकिंग, जीएसटी रिटर्न आणि एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड यासारख्या बाबींचा समावेश आहे.

युपीआय चार्जबॅकचा नवीन नियम
आत्तापर्यंत कोणत्याही व्यवहारांमध्ये चार्जबॅकसाठी क्लेम रिजेक्ट केल्यास बॅंकेला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून परवानगी घेत पुन्हा प्रक्रिया करावी लागत होती. आता 20 जून 2025 च्या नियमांनुसार बॅंके स्वत: योग्य चार्जबॅक क्लेमची प्रक्रिया दुसऱ्यांदा करु शकणार आहे. त्यासाठी एनपीसीआयच्या परवानगीची आवश्यकत नसणार आहे. त्यामुळे ग्राहकांचे व्यवहार जलदगतीने होणार असून समाधान होणार आहे.

तिकीट बुकिंगपासून ते एटीएमपर्यंत 1 जुलैपासून 4 मोठे नियम बदलणार; जाणून घ्या सर्वकाही

नवीन पॅनकार्डसाठी आधार कार्ड बंधनकारक..
आता कोणत्याही व्यक्तीला नवे पॅनकार्ड बनवायचे असेल तर त्याला आधार कार्डची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत कोणत्याही ओळखपत्र आणि जन्माच्या प्रमाणपत्रावरुन पॅनकार्डची प्रक्रिया केली जात होती. मात्र आता 1 जुलै 2025 पासून आधार कार्डची आवश्यकता असणार आहे.

रेल्वेच्या तिकीटासाठी ओटीपी अन् आधार कार्डची आवश्यकता…
आता तुम्हाला रेल्वे तिकीट बुकींग करावयाचे असल्यास या प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे. 1 जुलै 2025 पासून आयआरटीसी वेबसाईट आणइ मोबाईल अॅपवरुन तिकीट बुकींग करण्यासाठी आधार कार्डच्या व्हेरिफिकेशनची आवश्यकता असणार आहे. 15 जुलै 2025 पासून तिकीट बुकींगसाठी ओटीपीची आवश्यकता असणार आहे. हा नियम ऑनलाईन बुकींग आणि पीआरएस काऊंटरवरुन बुकींग करणाऱ्यांसाठी लागू आहे.

BJP Headquarters : भाजप मुख्यालयात सहा दिवस ड्युटीवर असणार राज्यमंत्री, नेमकं कारण काय?

याव्यतिरिक्त अधिकृत तिकीट एजंट बुकींगचे काऊंटर उघडण्याच्या अर्धा तास अगोदर तिकीट बुकींग करु शकणार नाहीत. एसी क्लास तिकीटांसाठी सकाळी 10 वाजता ते 10 : 30 पर्यंत. नॉन एसी तिकीटांसाठी सकाळी 11 वाजता ते 11 : 30 पर्यंत प्रतिबंध असणार आहे.

जीएसटी रिटर्नच्या नियमांमध्ये बदल..
जुलै 2025 पासून जीएसटीआर-3B फॉर्म एडीट करता येणार नाही. आता कोणतेही करदाते मागील तीन वर्षांचा जीएसटी रिटर्न फाईल करु शकणार नाहीत. हा नियम रिटर्न फॉर्मवर लागू असणार आहे.

HDFC क्रेडिट कार्ड युजर्ससाठी मोठी बातमी…
1 जुलैपासून HDFC बॅंक क्रेडिट कार्डधारकांसाठी आता नवीन चार्ज आणि रिवार्ड पॉलिसीमध्ये बदल करण्यात येत आहेत. जर महिन्यात आपला खर्च 10 हजारांपेक्षा अधिक होत असेल तर त्यावर 1 टक्के अतिरिक्त शुल्क आकाराण्यात येणार आहे. यासोबतच 50 हजारांपासून अधिक युटिलिटी बिल, 10 हजारांपासून अधिक ऑनलाईन गेमिंग, 15 हजारांपासून अधिक इंधन खर्चाशी संबंधित थर्ड पार्टी पेमेंट्सवर 1 टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे.

follow us