G20 Summit : राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषदेदरम्यान उभारलेल्या ‘भारत मंडपम’ची (Bharat Mandapam) मोठी चर्चा होत आहे. पूर्वीचे याचे प्रगती मैदान नाव आहे. G20 शिखर परिषदेसाठी मोदी सरकारने या ठिकाणी चांगली तयारी केली आहे. यामागे आर्किटेक्ट संजय सिंह यांची आयडिया आहे. त्यामुळे संजय सिंह कोण आहेत आणि त्यांच्या कलाकृतीबद्दल जाणून घेऊया…
भारत मंडपच्या निर्माणमध्ये विशेष काळजी घेण्यात आलेल्या कलाकृतीचे परदेशी पाहुणे खूप प्रभावित झाले आहेत. भारताचा इतिहास, संस्कृती आणि कलाकुसरीची विशेष काळजी घेण्यात आली आहे. यामागे संजय सिंह यांचा विचार आहे. ते एक चांगला आर्किटेक्ट आहे.
संजय सिंह म्हणतात की, भारत मंडपमची रचना केल्याच्या पहिल्या दिवसांपासून संपूर्ण प्रकल्पात कलेबाबत खूप काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये भारतातील कलाकुसर, संस्कृती आणि जीवनशैली यांचा बारकाईने विचार करण्यात आला आहे. ते पुढं म्हणाले की, भारताचे चित्र स्पष्टपणे समोर येईल अशा पद्धतीने भारत मंडपम तयार करणे हा त्यांचा उद्देश होता.
भारत मंडपम हे गंगा-यमुनेचे प्रतीक
आपल्या संशोधनाचा संदर्भ देत संजय सिंह म्हणाले की, आम्हाला एक रेखाचित्र सापडले ज्यामध्ये दोन मासे पाण्याच्या प्रवाहाने जोडलेले आहेत. आम्ही विचार केला की हे दोन मासे गंगा आणि यमुना यांचे प्रतीक आहेत तर पाण्याचा प्रवाह जीवनाचे अमृत आहे. भारत मंडपमची रचना या स्केचवर आधारित आहे.
ते म्हणाले, “आम्ही इमारतीला लंबवर्तुळाकार आकार दिला आहे. त्यामुळे तुम्हाला तेथे कोणतेही खडबडीत कडा किंवा कोपरे सापडणार नाहीत. कुठूनही नजर टाकली तरी यमुनेच्या पाण्याप्रमाणे ही इमारत दोन्ही बाजूंना सारखीच दिसेल. आम्ही इमारत 6 मीटरच्या पोडियमपर्यंत वाढवली आहे. स्टेजच्या दोन्ही बाजूला रिट्रीट लाउंज, टी हाऊस आणि बिझनेस सेंटर आहे. त्यामुळे नीट पाहिल्यास संपूर्ण पायाभूत सुविधा यमुनेच्या लाटांप्रमाणे वर-खाली होताना दिसतील.”
G20 Summit: G20 परिषदेची मोदींच्या भाषणाने समाप्ती, या परिषेतून भारतानं काय मिळवलं?
भारतातील सर्वात मोठे झुंबर
भारतातील सर्वात उंच झुंबर भारत मंडपममध्ये स्थापित केले आहे. भारत सरकारशी चर्चेनंतर 2016 मध्ये भारत मंडपमचे बांधकाम सुरू झाल्याचे संजय सिंह सांगतात.