देशातील प्रमुख उद्योजक गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतील घरी म्हणजे सिल्वर ओक पवार आणि गौतम अदाणी यांच्यात तब्बत २ तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पण या दोघांच्या मध्ये नक्की काय चर्चा झाली. याची माहिती अजून समोर आली नाही.
गौतम अदानी आणि त्यांच्या अदानी समूहावर अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीने प्रकाशित केलेल्या रिपोर्टनंतर देशभरात मोठी खळबळ माजली होती. याचा अदानी समूहाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. दुसरीकडे विरोधी पक्षाकडून देखील अदानी यांच्यावर प्रश्न विचारात सरकाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
Rahul Gandhi : फक्त ‘डिसमिस’ म्हणत न्यायाधिशांनी संपवला विषय; आता पुढे काय?
पण शरद पवार यांनी मात्र गौतम अदानी यांचं समर्थन केलं. याशिवाय त्यांनी विरोधकांनी मागितलेल्या संयुक्त संसद समितीला देखील विरोध केला. त्यामुळे शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या मैत्रीवर देखील प्रश्न उपस्थित केले गेले होते.
काही दिवसापूर्वी बोलताना पवार यांनी अदानी व अंबानी यांच्यावर देखील भाष्य केले. शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राला सर्वाधिक विजेचा पुरवठा हा अदानीं समूहाच्या कंपनीकडूनच होतो आहे. पंरतु याबाबत मी अदानींचे कौतुक करत नाही. मात्र, अदानींचे योगदान हे मान्य करावे लागेल.
Population Control Law : लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा काय ?, संविधान काय म्हणते ? जाणून घ्या..
या पूर्वी टाटा-अंबानींचे नाव घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात असत. मात्र, नंतर ज्येष्ठ उद्योगपती टाटांचे देशासाठी मोठे योगदान आहे, याची जाणीव झाल्यानंतर तशी टीका करणे बंद झाले. आता अदानींचे नाव घेऊन त्याप्रमाणेच टीका केली जात आहे. मात्र, अदानींचेही काही तरी योगदान आहे, हे मान्य करावे लागेल. असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.