Gautam Adani : अदानी समूहाचे (Gautam Adani) सर्वेसर्वा, उद्योगपती गौतम अदानी यांनी मोठी बातमी दिलीयं. वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्त होण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे, गौतम अदानी यांच्या या विधानानंतर अदानी समूहाच्या वारसदाराच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. 2030 साली वयाच्या 70 व्या वर्षी गौतम अदानी आपल्या निवृत्त होऊन मुलगा प्रणव अदानी यांच्या हाती अदानी उद्योगाची कमान देणार असल्याचं ब्लूमबर्ग अहवालात नमूद करण्यात आलंय.
व्यवसाय टिकवायचा असेल तर योग्य उत्तराधिकारी असणं खूप महत्त्वाचं आहे. मी ही निवड दुसऱ्या पिढीवर सोपवली आहे. जेणेकरून बदलाची ही प्रक्रिया हळुवार आणि अतिशय पद्धतशीर व्हावी, असं अदानी यांनी ब्लूमबर्गला सांगितलं. गौतम अदानी दुसऱ्या पिढीवर व्यवसायाची जबादारी सोपवणार आहे. गौतम अदानी यांच्यानंतर अदानी घराण्यातील चार वारसदार अदानी उद्योग समुहाची कमान हाती घेणार आहेत. यामध्ये मुलगा करण, जीत, पुतण्या प्रणव, सागर यांच्यासह कुटुंबातील सदस्य समूहाचे संचालक राहणार असल्याचा अहवालात सांगण्यात आलं आहे.
अल्काराजची ऑलिम्पिक चॅम्पियन बनण्याची संधी हुकली, नोव्हाक जोकोविचने पटकावले सुवर्णपदक
अदानी उद्योग समुहांमध्ये करण्यात आलेल्या गोपनीय करारानूसार कंपन्यांमधील भागभांडवल गौतम अदानी यांच्या वारसांकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं अहवालात सांगण्यात आलंय. अदानी समुहाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनूसार गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी हा अदानी पोर्टस्चा व्यवस्थापकीय संचालक आहे. तर लहान मुलगा जीत अदानी हा अदानी विमातळाचा संचालक असल्याची माहिती आहे. तर चुलत भाऊ प्रणव अदानी अदानी एंटरप्रायझेसचे संचालक आहेत. तसेच चुलत भाऊ सागर अदानी हे ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक असल्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आलीयं.
video: मेट्रोमध्येच भिडलं जोडपं; ‘माझ्या आयुष्यातून निघून जा’; एकमेकांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, वृत्तसंस्थेच्या अहवालानूसार प्रणव आणि करण हे अदानी उद्योग समुहाच्या अध्यक्षपदी विराजमान होतील, असं स्पष्ट संकेत दिसून येत आहेत. संकटकालीन परिस्थितीत धोरणात्मक संयुक्तिक निर्णय घेणार असल्याचं गौतम अदानी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलंय. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भविष्यात रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी प्रणव आणि करण हे सर्वाधिक संभाव्य उमेदवार आहेत. संकटाच्या काळात किंवा धोरणात्मक निर्णय संयुक्तपणे घेतले जातील, असं ब्लूमबर्गला दिलेल्या स्वतंत्र मुलाखतीत गौतम अदानी यांचे संभाव्य वारसदार प्रवण यांनी सांगितलं.