Download App

Manipur violence : भारतीय म्हणवून घ्यायची लाज वाटते, गौतम गंभीरनेही व्यक्त केला संताप…

Manipur Violence : मणिपूर घटनेवरुन देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. देशातल्या सर्वच स्तरातील नागरिकांमधून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला फटकारलं आहे. अशातच आता भारतीय क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर यांनीही या प्रकरणावर भाष्य करीत संताप व्यक्त केला आहे. गंभीर यांनी एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी संवाद साधला.

Manipur Violence : हल्ला करुन जमावाने मुलींसह महिलांना विवस्त्र केलं, पीडितेने सांगितली आपबिती…

खासदार गौतम गंभीर म्हणाले, मणिपूरची घटना खूप लज्जास्पद आहे. मला स्वत:ला भारतीय म्हणवून घेण्याची लाज वाटते, कारण हे प्रकरण फक्त मणिपूरपुरतेच मर्यादित नाही. या प्रकरणामुळे संपूर्ण देशाची मान खालवली असून याचं राजकारण करु नये, असं आवाहनही गंभीर यांनी केलं आहे.

‘इतिहासातील गाडलेली मढी उकरून ज्यांचा धर्म…’; मणिपूर घटनेवरून आव्हाडांचे मोदींवर टीकास्त्र

तसेच मणिपूरसारख्या घटना सामान्य घटना नाहीत. त्या होऊ न देणे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे. 4 मे रोजीचा महिलांचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमध्ये तणावाचे वातावरण आहे. एका बाजूचे काही लोक एका समाजातील दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढतांना व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे मला स्वतःला भारतीय म्हणवून घ्यायची लाज वाटतं, असल्याचं गंभीर म्हणाले आहेत.

डायबिटीज रुग्णांनी पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी? फंगल इफेक्शनचा जास्त धोका

दरम्यान, या घटनेवर विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप गंभीर यांनी केला असून ही सर्व 140 कोटी भारतीयांसाठी शरमेची बाब आहे. दोन महिला किंवा मुलींच्या बाबतीत असे काही घडत असेल तर ती संपूर्ण देशासाठी शरमेची बाब असून मणिपूरसारखी घटना भविष्यात कोणत्याही राज्यात घडू नये, असं ते म्हणाले आहेत.

हिंसाचाराच्या घटनेनंतर एका समुदायाकडून दोन महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या प्रकारानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं. व्हायरल व्हिडिओ प्रकरण सर्वोच्च न्यायालयांतर संसदेतही गाजल्याचं दिसून आलं. त्यानंतर सरकारकडून या घटनेची दखल घेण्यात आली. या घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींवर कडक शासन करण्यात येणार असल्याची ग्वाहीच मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी दिली आहे.

Tags

follow us