Girl Selling Rudrakhs Mala In Mahakumbh 2025 : महाकुंभ 2025 (Mahakumbh 2025) मध्ये पवित्र स्नान करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत. अनेक लोक या कुंभमेळ्यात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आलेत. दरम्यान, या गर्दीतली एक रूद्राक्षांच्या माळा विकणारी तरुणी व्हायरल झाली (Mahakumbh News) आहे. महाकुंभात साध्वी हर्षाने आपल्या सौंदर्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर या सुंदरीचा व्हिडिओ व्हायरल (Girl Selling Rudrakhs Mala) होतोय.
महाकुंभाच्या गर्दीतून दररोज अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. यामध्ये अनेक रंजक गोष्टी दाखवल्या जात आहेत. प्रयागराजमध्ये केवळ भाविकच आले नाहीत, तर अनेक लोक गर्दीत पैसे कमविण्यासाठी देखील येत (Mahakumbh Viral Video)आहेत. या गर्दीत एक तरूणी फिरत रुद्राक्षाच्या माळा विकताना दिसली. या तरूणीच्या सौंदर्याने महाकुंभातील प्रत्येकालाच भूरळ पडतेय. तिचे डोळे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. तिच्या डोळ्यांनी अशी जादू निर्माण केली की, काही वेळातच ही तरूणी व्हायरल झालीय.
Video : सैफवर हल्ला करणारा संशयित ताब्यात; आरोपीने शाहरूखच्या घराची रेकी केल्याची माहिती
आयआयटी मुंबईतून एरोस्पेस इंजिनिअरिंग केलेले बाबा आणि महाकुंभात साध्वी म्हणून आलेले हर्षा रिचारिया अशा अनेक ऋषी-मुनींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याशिवाय महाकुंभमध्ये रुद्राक्ष जपमाळ विकण्यासाठी प्रयागराजला पोहोचलेल्या एका सुंदर तरूणीच्या मुलाखतीचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. तिच्या सोनेरी डोळ्यांनी आणि सौंदर्याने लोकांना वेड लावलंय. तिचे काजळ भरलेले सोनेरी डोळे हृदयाचा वेध घेत आहेत. अनेक लोक तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी जवळ येत आहेत.
पतीवरच्या हल्ल्यानंतर अभिनेत्री करिनाची पहिली पोस्ट; मीडिया अन् पापाराझींना केलं ‘हे’ आवाहन
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमध्ये ही तरूणी रुद्राक्षाच्या जपमाळा विकण्यासाठी आलीय. व्हिडिओमध्ये ती महाकुंभ मेळ्यातील तिचे आतापर्यंतचे अनुभव शेअर करताना दिसत आहे. पत्रकाराने तरूणीला विचारले की, तू किती दिवसांपासून मेळ्यात आहेस? ही तरूणी उत्तर देते, “मला येवून दोन-तीन दिवस झाले आहेत.” मी प्रथमच महाकुंभ मेळ्याला आलेय. तसेच तिच्या सहकाऱ्यांकडे बोट दाखवत ती म्हणते की, हे लोक येतच राहतात. नेटकऱ्यांनी तरूणीच्या सौंदर्याचे कौतुक केलंय. त्याच वेळी अनेकांनी तिच्या स्मित आणि सुंदर डोळ्यांची प्रशंसा केलीय.