सोने खरेदी करताय? मग खिशाला झटका बसणारच, सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर..

आज शुक्रवारी सोन्याच्या दरात थोडी वाढ झाल्याचे दिसून आले. या दरवाढीमुळे सोने आता 93 हजार 390 रुपयांवर (प्रति 10 ग्रॅम) पोहोचले आहेत.

Gold Reserve

Gold Reserve

Gold Price 11th April 2025 : जागतिक बाजारातील अस्थिरता पाहता सोन्याचे दर (Gold Price) पुन्हा वाढू लागले आहेत. आज शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. या दरवाढीमुळे सोने आता 93 हजार 390 रुपयांवर (प्रति 10 ग्रॅम) पोहोचले आहेत. गुडरिटर्न्स वेबसाइटनुसार चांदी प्रति किलो 97 हजार 100 या दराने विक्री होत आहे. दरम्यान, सध्या अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध सुरू आहे. अमेरिकेने चीनवरील रेसिप्रोकल टॅरिफ कायम ठेवला आहे. याचाही परिणाम सोने चांदीच्या दरांवर होत आहे.

सध्याच्या परिस्थितीत 22 कॅरेट सोन्याचे दर 85 हजार 610 रुपये प्रति तोळा आहेत. तर 24 कॅरेट सोने मु्ंबई, चेन्नई आणि कोलकाता शहरात 93 हजार 390 रुपये दराने विक्री होत आहे. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे दर 93 हजार 540 रुपये झाले आहेत. 22 कॅरेट सोने मुंबई, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये 85 हजार 610 रुपयांना मिळत आहे.

राजधानी दिल्ली शहरात 22 कॅरेट सोने 85 हजार 760 रुपयांना विक्री होत आहे. तर दिल्ली, मुंबई, कोलकाता या शहरांत चांदी 97 हजार 100 रुपये प्रति किलो या दराने विक्री होत आहे. चेन्नईमध्ये एक किलो चांदीचे दर (Silver Price Today) एक लाखांच्या पुढे गेले आहेत. या शहरांत चांदी 1 लाख 7 हजार 100 रुपये प्रति किलो या दराने विक्री होत आहे.

गुढी पाडव्यापूर्वीच सोने अन् चांदीने मारली मोठी मुसंडी; चांदी 3 हजारांनी वाढल तर सोनंही गेलं सुसाट

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार (IBJA) 24 कॅरेट सोन्याचे दर बुधवारच्या 88 हजार 550 रुपयांच्या तुलनेत वाढून 90 हजार 161 रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच चांदीच्या दरात वाढ होऊन एक किलो चांदीचे दर 90 हजार 669 रुपयांवर पोहोचले आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या (US China Trade War) व्यापार युद्धामुळे गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळले आहेत. कारण सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. यामुळेच आज अमेरिकेतही सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.

Exit mobile version