गुढी पाडव्यापूर्वीच सोने अन् चांदीने मारली मोठी मुसंडी; चांदी 3 हजारांनी वाढल तर सोनंही गेलं सुसाट

Gold and Silver Rates : सोनं आणि चांदीच्या दराने ऐन गुढी पाडव्याच्या मुहूर्तावरच मोठी झेप घेतली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुत घसरण दिसली. तर त्यानंतर सलग तीन दिवस सोन्याचा दर वाढला. (Silver) चांदीने तर काल कहर केला. सोने जवळपास 1600 रुपयांनी वधारले. तर चांदीने 3 हजारांची झेप घेतली. पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याने 90 हजारांचा टप्पा ओलांडला. तर चांदी एक लाख 5 हजारांच्या पुढे पोहचली आहे.
कितीने महागलं?
या सोमवार आणि मंगळवारी सोने 210 आणि 330 रुपये असे एकूण 540 रुपयांनी स्वस्त झाले. तर बुधवारी 110, गुरूवारी 440 आणि शुक्रवारी 1140 रुपये असे एकूम 1690 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 83,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 91,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
लग्नसराईतच सोने-चांदीचे दर वाढल्याने तारांबळ; सोयरिक जुळल्यानंतर दागिने खरेदी करताना दमछाक
या सोमवार, मंगळवारी दोन दिवस किंमती स्थिर होत्या. बुधवारी चांदी 1000 रूपयांनी वधारली. गुरुवारी दरात बदल झाला नाही. तर शुक्रवारी चांदी 3,000 रुपयांनी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,05,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 89,164, 23 कॅरेट 88,807, 22 कॅरेट सोने 81,674 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 66,873 रुपये, 14 कॅरेट सोने 52,161 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,00,892 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.