Gold-Silver Price: सोने तीन लाख, तर चांदी सहा लाखांवर जाणार ? कोणी केलंय भाकीत?

Gold-Silver Price: अमेरिकेवर वाढते सार्वजनिक कर्ज. वाढत्या कर्जामुळे डॉलरवर दबाव निर्माण होईल. त्यातून महागाई वाढत राहिल.

Gold And Silver Price

Gold And Silver Price

Gold-Silver Price : Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी ( Robert Kiyosaki) हे जगातील शेअर बाजार, सोने-चांदीच्या भावाबदल (Gold-Silver Price ) वेगवेगळे भाकीत करत असतात. कियोसाकी यांनी सोने-चांदीच्या भावाबाबत आणखी एक मोठे भाकीत केलयं. या वर्षाच्या शेवटपर्यंत सोने तोळ्यामागे तीन लाख रुपयांपर्यंत जाईल, तर चांदीच्या एक किलोसाठी 6 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. पण सोने-चांदीच्या किंमती का वाढणार आहेत, याची कारणे कियोसाकी यांनी दिलेत. हे कारणे लेट्सअप मनीमध्ये जाणून घेऊया…

Shiv Sena party and Symbol Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हावर ठाकरेंचा दावा; सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद Live

बंर कियोसाकी यांनी हा दावा किंवा भाकित त्यांचे मित्र आणि आर्थिक विश्लेषक जिम रिकर्ड्स यांच्या मतानुसार केला आहे. चांदीची किंमत येत्या काही महिन्यात 200 डॉलर प्रति औंस, तर सोन्याची किंमत 10, 000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहाचू शकते. म्हणजेच सध्याचा दर पाहिला तर ही किंमत दुप्पट-तिपट्टीने वाढणार आहे. यानुसार किंमती वाढल्यानंतर भारतामध्ये दहा ग्रॅम सोन्याचे किंमत 3 लाख 6 हजार इतकी होईल. तर चांदीची किंमत 6 लाख 13 हजार इतकी होईल. सध्या भारतात दहा ग्रॅमसाठी 1 लाख 50 हजार ते 1 लाख 60 हजार रुपये मोजावे लागत आहे. तर चांदीसाठी 2 लाख 40 हजार रुपये मोजावे लागत आहेत.


भारताच्या निवडणूक प्रक्रियेचं ट्रम्पकडून कौतुक; अमेरिकेत नियम कडक करण्याचं आवाहन


सोने-चांदीच्या किंमती वाढण्याचे तीन कारणे ?

पहिले कारण आहे, अमेरिकेवर वाढते सार्वजनिक कर्ज. वाढत्या कर्जामुळे डॉलरवर दबाव निर्माण होईल. त्यातून महागाई वाढत राहिल. त्यावेळी कागदी चलन एेवजी म्हणजे पैसे साठविण्याएेवजी गुंतवणूकदार हे सोने, चांदी खरेदीकडे वळतील. तर दुसरे कारण आहे चांदीची वाढती मागणी. चांदीची मागणी आता केवळ दागिने निर्मितीपुरते मर्यादीत राहिलेले नाही. मोबाइल, सोलर पॅनल, इलेक्ट्रिक कार, एआयच्या इलेक्ट्रिक साहित्यसाठी चांदीची मागणी वाढली आहेत. त्यामुळे चांदीने भाव खाल्ला आहे. तर चांदीची खाणीमधून उत्पादन घटलेले आहेत. त्यामुळे पुरवठा कमी झालेला आहे. सोन्याच्या किंमती वाढण्यामागे जगातील मध्यवर्ती बँका कारणीभूत आहे. या मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोने व चांदीची खरेदी करत आहेत.

इतर घटकही कारणीभूत
सोने व चांदीच्या किंमती वाढण्यामागे इतर घटकही कारणीभूत आहे. डॉलर, अमेरिकेचे व्याजदर, जागतिक मंदी, युद्ध, या धातूंचे उत्पादन या कारणांमुळे सोने-चांदीच्या किंमत वाढत किंवा घटत असतात.

कियोसाकी यांनी आतापर्यंत अनेक भाकीते, दावे केलेले आहेत. त्यातील काही दावे खरे ठरले आहेत. तर काही दावे फुसके बार ठरलेले आहेत. आता हा दावा किती खरा ठरतो हे येत्या दोन-तीन महिन्यात समोर येईलच.

Exit mobile version