Gold-Silver Price Crash : चांदी 20 हजारांनी स्वस्त, सोनेही किती हजारांनी कोसळले ?

Gold-Gold-शुक्रवारी तो घसरून 1 लाख 62 हजार 800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. तिचा भाव 2,96,600 रुपये प्रति किलोवरून थेट 2,75,000 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आलाय.

  • Written By: Published:
GOLD AND SILVER RATE

Gold-Silver Price Crash: जागतिक बाजारातील मोठ्या विक्रीमुळे सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दरात मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या दरात तब्बल 21,600 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचा भाव 2.75 लाख रुपये प्रति किलोवर आहे. तर त्याचवेळी सोन्याचा दरही 3,200 रुपयांनी घसरून 1.62 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.


तटकरे प्रदेशाध्यक्ष नाहीत, पटेल कार्याध्यक्ष नाहीत; राष्ट्रवादीत नक्की चाललय काय?

ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर गुरुवारी 1.66 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. मात्र शुक्रवारी तो घसरून 1 लाख 62 हजार 800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. तिचा भाव 2,96,600 रुपये प्रति किलोवरून थेट 2,75,000 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आलाय.


शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी; महाटीईटीची परीक्षा आता नव्या तारखेला


दरात घसरणीचे कारण काय ?

अमेरिकन डॉलर मजबूत होणे, गुंतवणूकदारांकडून मुनाफावसूली आणि वाढता जागतिक तणाव यामुळे मौल्यवान धातूंवर दबाव निर्माण झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी तज्ज्ञ सौमिल गांधी यांच्या मते, अमेरिका-इराण तणाव, महागलेले ऊर्जा दर आणि सप्लाय चेनबाबतची चिंता यामुळे गुंतवणूकदार डॉलर आणि अमेरिकन बाँडमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी काहीशी कमी झाली आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारातही किंमती घसरल्या

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. सोन्याचा भाव सुमारे 104 डॉलरने घसरून 4,548 डॉलर प्रति औंसवर आला आहे. तर चांदीचा दर 5 डॉलरपेक्षा अधिक घसरून 78 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आला. एलकेपी सिक्युरिटीजचे विश्लेषक जतिन त्रिवेदी यांनी सांगितले की, कच्च्या तेलाच्या किमती वाढणे आणि डॉलर मजबूत होणे यामुळे सोने-चांदीवर दबाव वाढला आहे. गेल्या काही दिवसांत दरात मोठी वाढ झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्यानेही बाजारात मोठी घसरण दिसून आली.

follow us