Google AI Mode in Search : जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलने भारतासाठी एक खास घोषणा केली आहे. Google ने भारतात AI Mode in Search नुकतेच लाँच केले आहे. यामुळे आता युजर्सचा सर्चिंग एक्सपीरियन्स पूर्णपणे बदलणार आहे. युजर्सना पहिल्यापेक्षा जास्त चांगले रिजल्ट याद्वारे मिळतील असा दावा कंपनीने केला आहे. Google ने यासाठी Gemini 2.5 चे कस्टम वर्जन वापरले आहे.
या निर्णयाची माहिती कंपनीने स्वतःच दिली आहे. कंपनीने (Google in India) आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की हा आतापर्यंतचा सर्वात प्रभावी एआय सर्च एक्सपीरियन्स आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गुगलचा AI Mode आता Google Search च्या AI Overview ची जागा घेणार आहे. कंपनीने या नव्या पद्धतीत नेमकं काय केलं आहे याची सविस्तर माहिती घेऊ या..
सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर भारतात AI Mode लाँच करण्यात आम्हाला आनंद वाटत आहे. या सर्व्हिसची सुरुवात आजपासून (मंगळवार) होत आहे. भारतीय युजर्ससाठी आणखी काय चांगलं करता येईल याचा आढावा या माध्यमातून घेण्यात येईल. त्यानुसार महत्वाचे बदल करता येतील.
AI Mode प्रायोगिक तत्वावर सर्वात आधी अमेरिकेसाठी जारी करण्यात आले होते. यानंतर दुसऱ्या देशांसाठी जारी करण्यात आले. सध्या भारतात AI Mode फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. अन्य भारतीय भाषा यात हळूहळू घेण्यात येतील. AI Mode in Search च्या वेगाने अनेकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळवल्या आहेत असे गुगलने ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे.
AI Mode in Search चा वापर करणे अतिशय सोपे आहे. यासाठी सध्या युजर्सना Google Labs मध्ये जाऊन याचा वापर करता येईल. येथे आल्यानंतर Turn this experiment on or off च्या समोर दिलेल्या पर्यायांना चालू किंवा बंद करावे लागेल. एकदा इनेबल केल्यानंतर युजर्सना Try AI Mode चा पर्याय मिळेल. यावर क्लिक केल्यानंतर Google च्या नव्या फिचरचा अॅक्सेस मिळेल.
‘Google Pay’ ‘Phone Pay’ वर वारंवार बॅलन्स चेक करताय? मग, आधी ‘हा’ नवा नियम लक्षात ठेवाच!
गुगलच्या या खास फिचरला युजर्स त्यांच्याकडील मोबाइलसह लॅपटॉप आणि कॉम्प्यूटरवर देखील वापरू शकतात. सध्या सुरुवातीच्या टप्प्यात युजर्सना Google Labs च्या मदतीने या फिचरचा वापर करता येईल.
गुगलने दिलेल्या माहितीनुसार AI Mode कंपनीचे सर्वात पॉवरफूल AI Search आहे. यामध्ये अॅडव्हान्स्ड रिजनिंग कॅपेबिलिटी आहे आणि मल्टीमॉडलिटी फीचर आहे. यामुळे AI Mode अधिक चांगल्या पद्धतीने आणि अधिक सखोलपणे माहितीचा शोध घेतो. काही वेळेस अत्यंत कठीण वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरेही AI Mode अगदी सहज देतो.