IDBI Bank : देशातील आणखी एक सरकारी बँक विकली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, आयडीबीआय बँकेचा खाजगीकरण या वर्षाच्या अखेरीस होणार आहे. याबाबत माहिती देताना, वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू (M. Nagaraju) म्हणाले की, आयडीबीआय बँकेतील (IDBI Bank) भागभांडवलाची धोरणात्मर विक्री 2025 मध्ये पुर्ण होणार आहे. मंगळवारी, बँकेचे शेअर्स 77.94 रुपयांवर व्यवहार करत आहे. मंगळवारी या बँकेच्या शेअर्समध्ये दुपारी तीनपर्यंत 3 टक्के घसरण दिसून आली आहे.
आयडीबीआय बँकेचा खाजगीकरणबाबत माहिती देताना नागराजू म्हणाले की, आयडीबीआय बँकेतील हिस्सेदारी विक्री या कॅलेंडर वर्षात पूर्ण होईल, असं नागराजू म्हणाले. ते फर्स्ट रेसिडेन्शियल मॉर्टगेज बॅक्ड सिक्युरिटीजच्या लिस्टिंग कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना नागराजू पुढे म्हणाले की, केंद्र सरकार आणि भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) संयुक्तपणे कर्जदात्यातील 61 टक्के हिस्सा विकण्याची योजना आखत आहेत. ज्यामध्ये सरकारचा 30.48 टक्के आणि विमा कंपनीचा 30.24 टक्के हिस्सा असेल. जानेवारी 2023 मध्ये, सरकारला बँकेतील 60.72 टक्के हिस्सा विक्रीसाठी अनेक स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) प्राप्त झाल्या होत्या. निवडलेल्या बोलीदारांची सध्या योग्य ती तपासणी सुरू आहे. असं देखील ते म्हणाले.
तर दुसरीकडे 2025-26 या आर्थिक वर्षासाठी केंद्राने 47,000 कोटी रुपयांचे निर्गुंतवणुक आणि मालमत्ता मुद्रीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे. इतर निर्गुंतवणुकीच्या योजनांसह हे उद्दिष्ट साध्य करण्यात आयडीबीआय बँकेचा व्यवहार सर्वात महत्त्वाचा वाटा ठरेल अशी अपेक्षा आहे. मार्च तिमाही निकाल आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीत आयडीबीआय बँकेचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 26 टक्क्यांनी वाढून 2,051 कोटी रुपयांवर पोहोचला. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या (जानेवारी-मार्च) तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 1,628 कोटी रुपये होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2024-25 साठी निव्वळ नफा वार्षिक आधारावर 33 टक्क्यांनी वाढून 7,515 कोटी रुपये झाला.
ब्रेकिंग! अहिल्यानगरसाठी मेडिकल कॉलेज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीतून मोठी घोषणा
2023-24 या आर्थिक वर्षात ते 5,634 कोटी रुपये होते. गेल्या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न 33,826 कोटी रुपयांपर्यंत वाढले, जे 2023-24 मध्ये 30,037 कोटी रुपये होते.