Download App

मोदी सरकार स्वस्तात देणार ‘भारत तांदूळ’ : निवडणुकीपूर्वी महागाईवर मात करण्यासाठी पाऊल

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवर मात करण्यासाठी केंद्र सरकार आता सवलतीच्या दरात तांदूळ उपलब्ध करुन देणार आहे. 25 रुपये प्रति किलो दराने ‘भारत तांदूळ’ बाजारात येणार आहे. livemint.com ने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. यापूर्वी दिवाळीमध्ये केंद्र सरकारने भारत आटा (गव्हाचे पीठ) आणि ‘भारत डाळ’ (डाळी) या वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करुन दिल्या होत्या. (government is considering the introduction of ‘Bharat rice’ at a discounted rate of Rs 25 per kilogram)

वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारत तांदूळ नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात नाफेड, नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनसीसीएफ), केंद्रीय भंडार आउटलेट्स आणि सरकारी एजन्सीद्वारे उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय मोबाईल व्हॅनमधूनही हा तांदूळ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.

‘तुम्ही अयोध्येला आले किंवा नाही काही फरक पडणार नाही’, विखेंचा ठाकरेंवर निशाणा

भारतात तांदळाच्या किंमतीत लक्षणीय वाढ होत आहे. सध्या किरकोळ तांदळाचा दर 43.3 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 14.1 टक्के वाढ झाली आहे. अशात आगामी निवडणुकांच्या तोंडावर या वाढत्या महागाईचा फटका बसण्याची शक्यता लक्षता घेत केंद्र सरकारने सवलतीच्या दरात तांदूळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी भारत आटा (गव्हाचे पीठ) 27.50 रुपये तर भारत डाळ 60 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध करुन देण्यात आली होती.

राज्य सरकारने आरक्षण दिलंच पाहिजे पण.. आरक्षणप्रश्नी आमदार तांबेंचे मोठे वक्तव्य

केंद्र सरकारने अलिकडील काही महिन्यांत तांदळाच्या किंमतींवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही उपाययोजनाही केल्या होत्या. यात बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती आणि बासमती तांदळासाठी निर्यात शुल्क लागू केले होते. आता खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत भारतीय खाद्य निगम (FCI) ने सवलतीच्या दरात तांदूळ उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

follow us