Download App

मे महिन्यामध्ये GST Collection 2.01 लाख कोटींवर; एप्रिलच्या तुलनेत कर संकलनात घट

मे महिन्यात केंद्र सरकारने २.०१ लाख कोटी कोटींची कमाई केली. मागील वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात जीएसटीत मोठी वाढ झाली

GST Collection: अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) आज मे महिन्यातील वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनाची आकडेवारी जारी केली. मे महिन्यात केंद्र सरकारने २.०१ लाख कोटी कोटींची कमाई केली आहे. मागील वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात जीएसटीत मोठी वाढ झाली आहे. मे २०२४ मध्ये १.७२ लाख कोटी रुपयांचा कर जमा झाला होता. त्या कर संकलनाच्या तुलनेत मे २०२५ मध्ये १६.४ टक्क्यांनी वाढ झाली.

‘त्यांची लायकी… संपूर्ण महाराष्ट्राला माहिती’; लक्ष्मण हाकेंच्या आरोपांना सुनील तटकरेंचं उत्तर 

एप्रिल २०२५ मध्ये, भारताचे जीएसटी संकलन १२.६ टक्क्यांनी वाढून २.३७ लाख कोटी रुपये झाले होते. तर मे २०२५ मध्ये भारताचे एकूण वस्तू आणि सेवा कर संकलन २.०१ लाख कोटी रुपये झाले आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या कर संकलनाच्या तुलनेत मे महिन्यामध्ये जीसएटी संकलन कमी झाले आहे. मात्र, मे २०२४ मध्ये १.७२ लाख कोटी रुपयांचा कर जमा झाला होता. त्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात १६.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आयातीतून गोळा होणाऱ्या जीएसटीमध्ये २५.२ टक्के वाढ झाली आहे. तर देशांतर्गत व्यवहारांमधून १३.७ टक्के वाढ झाली. आयातीतून एकूण जीएसटी महसूल ५१,२६६ कोटी रुपये झाला, तर देशांतर्गत व्यवहारांमधून १,४९,७८५ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे.

एकूण जीएसटी महसूल किती ?
मे महिन्यात, एकूण जीएसटी महसूल ४.३७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता. जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ३.८३ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत १४.३ टक्क्यांची वाढ दर्शवितो.

मे महिन्यातील निव्वळ जीएसटी महसूल १,७३,८४१ कोटी रुपये झाला, जो मे २०२४ मध्ये गोळा झालेल्या १,४४,३८१ कोटी रुपयांच्या तुलनेत २०.४% जास्त आहे. या महिन्यात एकूण परतफेड २७,२१० कोटी रुपये झाली, जी मागील वर्षाच्या तुलनेत ४% कमी आहे.

अर्थसंकल्पात, सरकारने वर्षभरासाठी जीएसटी महसुलात ११ टक्के वाढीची अपेक्षा व्यक्त केली आहे. केंद्रीय जीएसटी आणि भरपाई उपकरासह ११.७८ लाख कोटी रुपये वसूल होण्याचा अंदाज आहे.

 

follow us