Download App

GSTN : जीएसटीत गोलमाल करणाऱ्यांनो सावधान! आता असणार ED ची करडी नजर!

GSTN in PMLA : जीएसटीसंदर्भात केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. जीएसटीमध्ये गोलमाल करणाऱ्यांवर ईडीची करडी नजर राहणार आहे. जीएसटी नेटवर्कचा आता अर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यात (PMLA) समावेश करण्यात आला आहे.

देशात जीएसटी चुकवणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता जीएसटीमध्ये गोलमाल करणारे ईडीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.

राष्ट्रवादीत मीठाचा खडा टाकणारा शकुनी टरबुज्याच्या आकाराचा की कमळाच्या आकाराचा; कोल्हेंचा हल्लाबोल

केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून आता वस्तू व सेवा कर स्वरुपात कर वसूल करण्यात येत आहे. अनेक व्यापाऱ्यांना आता जीएसटी अर्थात वस्तू सेवा करच्या स्वरुपात कर भरावा लागत आहे. या करामध्ये अनेक व्यापारी गोलमाल करत असल्याचं निदर्शनास आल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Sourav Ganguly Birthday: ऑस्ट्रेलियाची दडपशाही, इंग्लडची मक्तेदारी संपविणारी गांगुलीची ‘दादा’गिरी

जीएसटी नेटवर्कचा पीएमएलए कायद्यात समावेश झाल्याने आता कर चुकवणारे आणि जीएसटीच्या कागदोपत्रांमध्ये फेरफार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने आता ईडीकडून जीएसटी नेटवर्कची माहिती पीएमएलए कायद्यांतर्गत मागवली जाऊ शकते. यामध्ये जीएसटीचे गुन्हे, बनावट बिल, फेक इनपुट टॅक्स क्रेडिट अशा गुन्हेगारी प्रकारांचा समावेश असणार आहे.

Tags

follow us