Sourav Ganguly Birthday: ऑस्ट्रेलियाची दडपशाही, इंग्लडची मक्तेदारी संपविणारी गांगुलीची ‘दादा’गिरी
Sourav Ganguly Is Celebrating His 51st Birthday: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज कर्णधार दिसले आहेत, यामध्ये सौरभ गांगुलीचेही एक नाव आहे. 2000 साली भारतीय संघ फिक्सिंगच्या भोवऱ्यात अडकला होता, त्यावेळी गांगुलीने कर्णधार बनून संघाला या अंधारातून बाहेर काढले. सौरव गांगुली आज त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुलीचे चाहते सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.
सौरभ गांगुलीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात 1992 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे पदार्पणाने झाली. यानंतर गांगुलीला पुढच्या संधीसाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. 1996 साली इंग्लंड दौऱ्यावर गांगुलीला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच कसोटीत शतक झळकावले. गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्यास सुरुवात केली.
सेक्रेड गेम्स 2 मध्ये इंटिमेट सीन शूट करताना मासिक पाळीच्या… अमृता सुभाषने सांगितला अनुभव
1999 च्या एकदिवसीय विश्वचषकात सौरव गांगुलीने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक खेळी केली होती. त्यावेळी गांगुलीची 158 चेंडूत 183 धावांची खेळी ही विश्वचषकाच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च खेळी होती.
सन 2000 मध्ये सौरव गांगुलीला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले तेव्हा टीम बदलाच्या टप्प्यातून जात होती. त्यात वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, महेंद्रसिंह धोनी आणि झहीर खान या महत्त्वाच्या खेळाडूंसह अनेक नवीन युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला. गांगुलीने आपल्या कर्णधारपदात सर्वांनाच संधी दिली नाही तर त्याला एक मोठा स्टार खेळाडूही बनवले.
2002 मध्ये गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्यांदा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याच वर्षी टीम इंडियाने लॉर्ड्सच्या मैदानावर सौरव गांगुलीची दादागिरीही पाहिली जेव्हा भारताने नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर एका रोमहर्षक सामन्यात पराभूत केले. इथून चाहत्यांना टीम इंडियाची बेधडक स्टाइल मैदानावर पाहायला लागली.
कथा महाराष्ट्राच्या राजकारणाची अन् षडयंत्र-कट-कारस्थानाची; शरद पवार येणार मोठ्या पडद्यावर
तसेच ऑस्ट्रेलियन संघाचा सामना करणे आणि पराभूत करणे हे 90 च्या दशकापासून कोणत्याही संघासाठी सोपे काम नव्हते, परंतु भारतीय संघाने ते करून दाखवले. सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम ऑस्ट्रेलियात 4 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पोहोचली तेव्हा तेथील कसोटी मालिकेत 1 सामना जिंकण्यात यश आले. या परदेश दौऱ्याकडे पाहता, त्यावेळी टीम इंडियासाठी हा मोठा विजय मानला जात होता. याशिवाय मायदेशात गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग 16 कसोटी विजयांचा ऑस्ट्रेलियन संघाचा विजयी रथ रोखण्याचे कामही केले होते.