Rahul Gandhi : मोदी आडनावाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल गुजरातमधील सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवले आहे. जिल्हा न्यायालय लवकरच शिक्षा जाहीर करणार आहे. न्यायालयात सुनावणीदरम्यान राहुल गांधी उपस्थित होते. कोर्टात हजर राहण्यासाठी राहुल गुरुवारी सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचले होता. राहुल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला आहे.
हे वाचा : आधी लुटा मग शिक्षेविनाच सुटका, चोक्सीवरून राहुल गांधींचा भाजपवर निशाणा
काय आहे प्रकरण ?
ही घटना सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधीची आहे. कर्नाटकातील कोलार येथे एका सभेत राहुल गांधी यांनी ‘कैसे सभी चोरों का सरनेम मोदी है?’ असे म्हटले होते, असा आरोप आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजपा आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली होती. राहुल गांधींच्या या टिप्पणीने संपूर्ण मोदी समाजाची बदनामी केल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला आपल्या तक्रारीत केला होता.
राहुल गांधींवर मानहानीचा खटला
पूर्णेश मोदी यांनी सुरतमध्ये राहुल गांधींविरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यांच्या तक्रारीवर सुरत शहरातील मुख्य न्यायदंडाधिकारी एच.एच. व्होरा यांच्या न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाली. शुक्रवारी दोन्ही बाजूंतील प्रदीर्घ युक्तिवाद संपले.
राहुल गांधी मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही, नाना पटोले मोदींवर बरसले
ऑक्टोबर २०२१ मध्ये राहुल गांधी या प्रकरणात शेवटचे कोर्टात हजर झाले होते. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर राहण्यापासून सूट देण्यात आली होती. आपल्याला याची माहिती नसून आपण निर्दोष असल्याचे राहुल यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते. त्याचवेळी, राहुल गांधींच्या वकिलाने असा युक्तिवाद केला होता, की काँग्रेस नेत्याविरुद्ध कोणतेही कागदोपत्री पुरावे नाहीत आणि 13 कोटी लोकसंख्या असलेल्या समाजाबद्दल कोणताही राजकारणी चुकीचे विधान करू शकत नाही. राहुल गांधींच्या वकिलाने स्पष्टीकरण दिले होते की, त्यांनी समाजावर नव्हे तर नरेंद्र मोदी, ललित मोदी, नीरव मोदी आणि इतरांच्या नावावर भाष्य केले होते.