Gujarat Schools New Rules : मुलांना शाळेत जाताना दप्तर न्यावंच (Gujarat Schools New Rules) लागतं. दप्तराचं ओझं इतकं असतं की मुलं कंटाळा करतात. परंतु, या गोष्टीला पर्याय नाही शाळेत जायचं म्हटलं की दप्तर पाहिजेच. पण, या त्रासातून विद्यार्थ्यांना किमान एक दिवस सुट्टी मिळणार आहे. होय, आठवड्यातील प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांनी दप्तराविनात शाळेत जायचं आहे. हा निर्णय महाराष्ट्राशेजारील गुजरात राज्यानं घेतला आहे. गुजरात सरकारने (Gujarat Schools New Rules) राज्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी दर शनिवारी दप्तर न घेताच शाळेत जायचं आहे. इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी सरकारी आणि अनुदानित शाळांत हा निर्णय लागू केला जाणार आहे.
या निर्णयानुसार शनिवार आता विद्यार्थ्यांसाठी दप्तरविरहीत दिवस असेल. या दिवशी शाळेत फिजिकल अॅक्टिविटी घेतल्या जातील. शिक्षण विभागाने सर्व शाळांना सूचना दिल्या आहेत की या दिवशी अभ्यासाव्यतिरिक्त फिजिकल अॅक्टिविटी करवून घेतल्या जातील. यामध्ये योग, मास ड्रिल, कल्चरल अॅक्टिविटी खेळ, प्रोजेक्ट, म्यूझिक, पेंटिंग, टूरिज्म यांचा समावेश असेल.
भाषावाद निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या अन् पोरांच्या शाळा कोणत्या?; वाचा अन् मगच राजकारण करा
सरकारने नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मुलांच्या मानसिक आणि शारिरीक विकासाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मुलांचा स्क्रिन टाइम वाढला आहे. मुले तासनतास टिव्ही आणि मोबाइल पाहत राहतात. त्यामुळे त्यांचा मानसिक, शारिरीक आणि सामाजिक विकासावर परिणाम झाला आहे. या गोष्टींचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला आहे.
शनिवारी राज्यातील शाळांत विद्यार्थ्यांकडून फिजिकल अॅक्टिविटी करवून घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा शारिरीक आणि मानसिक विकास होण्यास मदत होईल. शाळांमध्ये मास ड्रिल आणि योग यांसारख्या (Yoga) गोष्टींवर जास्त भर देण्याच्या सूचना आहेत. यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या (Obesity in Children) कमी होण्यास मदत होईल.
गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी? सपकाळांचा सवाल