भाषावाद निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या अन् पोरांच्या शाळा कोणत्या?; वाचा अन् मगच राजकारण करा…

Aditya Thackeray Sharad Pawar Study In Which School : राज्यात सध्या मराठी भाषेवरून राजकारण तापतंय. ठाकरे बंधू (Uddhav Thackeray) मराठीच्या अस्मितेसाठी एकवटले आहेत. त्यामुळे आता राजकीय नेते आणि त्यांचे मुले कोणत्या शाळेत शिकले, यावरून रान पेटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Raj Thackeray) अन् मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देत टीका केली आहे.
ठाकरे बंधूंचा भारतीय भाषांना विरोध, मात्र इंग्रजीला पायघड्या, असा टोला देखील देवेंद्र फडणवीसांनी यांनी लगावला आहे. मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, असा देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार आदित्य ठाकरे, मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी कोणत्या शाळेत शिक्षण घेतलं, ते आपण जाणून घेऊ या.
खळबळजनक! अजित पवार गटाच्या युवक नेत्याने उचललं टोकाचं पाऊल; माजी उपमहापौरांसह 7 जणांविरोधात FIR
अमित ठाकरे यांनी मुंबईतील आर.ए. पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर उद्धव ठाकरे यांनी त्यांचं शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यामंदिरातून पूर्ण केलंय. आदित्य ठाकरेंनी प्राथमिक शिक्षण मुंबईच्या माहिम येथील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर फोर्ट येथील सेंट झेवियर्स कॉलेज येथून आदित्य यांनी इतिहासमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली. त्यानंतर चर्चगेट येथील किशनचंद चेलाराम लॉ कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण पूर्ण केल्याची माहिती मिळतेय.
बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून तेजस ठाकरे यांचं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर त्यांनी जय हिंद कॉलेजमधून पुढील शिक्षण घेतलं. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या सरस्वती विद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं. तर मुख्यमंत्री फडणवीसांची मुलगी दिविजाचं कैथेड्रल स्कूलमधून शिक्षण झालंय. एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील किसननगर क्र.3 येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. 23 येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केलं.
पुणे हादरलं! स्प्रे मारला, बलात्कार केला अन् सेल्फी काढून डिलिव्हरी बॉयनं ‘पुन्हा येईल’सांगितलं…
श्रीकांत शिंदे यांनी किसन नगर-3 येथील मिथिला इंग्लिश हायस्कूलमधून शिक्षण घेतलं. शरद पवार बारामतीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिकले. नंतर काही काळ नगरमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात केलं. अजित पवार यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून सुरूवातीचं शिक्षण घेतलं. नंतर त्यांनी मुंबई आणि कालांतराने कोल्हापूरमधून शिक्षण पूर्ण केलं. तर सुप्रिया सुळेंचं शिक्षण मुंबईतील सेंट कोलंबा स्कूलमधून झालंय. ही माहिती एबीपी माझाच्या हवाल्यानुसार मिळत आहे.