Gujarat Wall Collapsed : गुजरात राज्यातील मेहसाणा (Gujarat Wall Collapsed) जिल्ह्यात आज दसऱ्याच्या दिवशी धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील जासलरपूर (ता. कादी) या गावात मोठी दुर्घटना घडली. येथील एका खासगी कंपनीची भिंत कोसळून झालेल्या अपघातात सात मजुरांचा मृत्यू झाला. तसेच काही जण जखमी झाले. ही घटना जिल्हा मुख्यालयापासून 37 किलोमीटर अंतरावरील परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या भिंतीखाली आणखीही काही मजूर अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे.
Haryana Accident: ऐन दसऱ्याच्या दिवशी भीषण अपघात, कार कालव्यात कोसळ्याने 7 जणांचा मृत्यू…
सध्या जेसीबीच्या मदतीने मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुःखद घटना जासलपूर आल्डसेन गावांदरम्यान एका खासगी कंपनीत घडली. जासलपूर गावातील एका स्टेनलेस स्टिलच्या कंपनीत भिंत बांधकाम सुरू होते. याच दरम्यान माती खचल्याने येथे काम करणारे मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले.
मेहसाणाचे पोलीस प्रमुख तरुण दुग्गल यांनी सांगितले की येथील माती खचल्याने सात मजुरांचा मृत्यू झाला. पोलिसांची एक टीम आणि रुग्णवाहिका घटनास्थळी हजर आहेत. मजुरांचे मृतदेह पोस्टमार्टसाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसेच या घटनेत जखमी झालेल्या मजुरांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. कामगार टाकी खोदत असताना अचानक माती खचून ही दुर्घटना झाल्याचेही सांगितले जात आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या चौकशीनंतर माहिती समोर येईल.
हा अपघात जाणूनबुजून घडवण्यात आला? भारतीय रेल्वेचा खळबळजनक दावा; ‘NIA’ करणार तपास
दरम्यान, याआधी दाहोद जिल्ह्यातही अशाच प्रकारची घटना घडली होती. घराची भिंत कोसळून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तर या कुटुंबातील दोन लहान बहिण भाऊ यांच्यासह तीन सदस्य जखमी झाले होते. मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. या घटनेनंतर पुन्हा भिंत कोसळण्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
MUST READ :
Gujarat Bridge Collapse : मोठी दुर्घटना! गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला; 2 जण ठार
गुजराती ठगाने गुजरात अन् देशात भिंत बांधलीयं; उद्धव ठाकरेंकडून अमित शाहांची पोलखोल
Video : गुजरातची सुंदरी ठरली इंडिया मिस युनिव्हर्स; आनंद व्यक्त करताना काय म्हणाली रिया सिंघा?