मोठी बातमी! एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्याचा एन्काउंटर? नक्की काय घडलं..

प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवच्या (Elvish Yadav) घरावर गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.

Elvish Yadav

Elvish Yadav

Elvish Yadav Latest News : प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवच्या (Elvish Yadav) घरावर गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर तो जखमी झाला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इशांत उर्फ इशू गांधी असे या गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी एल्विशच्या यादवच्या घरावर गोळीबार झाला होता. गोळीबार झाला तेव्हा एल्विश घरी नव्हता. त्याच्या घरातील काही सदस्य होते. गोळीबार करणारे आरोपी दुचाकीवरुन आले होते. यातील दोघांनी जवळपास 25 राउंड फायर केले होते. परंतु, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 राउंड फायर झाले होते.

या घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपीचा पोलिसांनी एन्काउंटर केला. इशांत गांधी असे या आरोपीचे नाव आहे. तो फरीदाबाद येथील जवाहर कॉलनी येथील रहिवासी आहे. इशांतने पोलिसांवर ऑटोमॅटिक पिस्तुलातून अर्धा डझनपेक्षा जास्त गोळ्या झाडल्या. पोलिसांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

एल्विश यादव हिटलिस्टवर! भाऊ गँगने घेतली गोळीबाराची जबाबदारी, धक्कादायक खुलासा 

भाऊ गँगने घेतली होती हल्ल्याची जबाबदारी

एल्विश यादवच्या (Elvish Yadav) घरी झालेल्या गोळीबाराची जबाबदारी भाऊ गँगचे (Bhau Gang) गुंड नीरज फरीदपूर आणि भाऊ रिटोलिया यांनी घेतली होती. त्यांनी ही सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली होती. गोळीबाराचे कारण देताना त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं की बेटिंग अॅपची जाहिरात करून एल्विशने अनेक घरे उद्ध्वस्त केली आहेत. सोशल मीडिया पोस्टची पुष्टी झालेली नाही.

नक्की काय घडलं होतं

हल्लेखोरांनी 25 ते 30 राउंड गोळ्या चालवल्या असा दावा एल्विशच्या वडिलांनी केला. पोलिसांनी मात्र 10 ते 12 राउंड गोळीबार झाल्याचे सांगितले. गुरुग्राम पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना पहाटे साडेपाच वाजता घडली. तीन लोक दुचाकीवरून आले. यातील दोघांनी गोळीबार केला. फायरिंग घराच्या ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरवर झाली. एल्विश स्वतः तिसऱ्या मजल्यावर राहतो. गोळीबार झाला तेव्हा घरातील सदस्य आणि केयरटेकर घरात होते.

गुरुग्रामचे पोलीस पीआरओ संदीपकुमार यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले होते की एल्विश यादवच्या घराबाहेर तीन गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गोळीबार केला. ही घटना साधारण पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. यात एक डझनाहून अधिक राउंड फायरिंग झाली. या गोळीबारात कुणी जखमी झाले नसले तरी घराच्या आत  भिंती आणि खिडक्यांचे किरकोळ नुकसान झाले.

ब्रेकिंग! प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवच्या घरावर अंदाधुंद गोळीबार; अज्ञातांकडून 25 राउंड फायरिंग

Exit mobile version