Chandrashekhar Azad Attack : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर हल्ला करणाऱ्या चार आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश पोलिसांकडून चार आरोपींना हरियाणामधील एका ढाब्यावरुन अटक करण्यात आलीय. सध्या हे आरोप उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहेत.
शिवसेनेत अस्वस्थता वाढली; 13 आमदार अन् 5 खासदारांना अजित पवारांचा धसका
अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख पटली असून प्रशांत, विकास, सविश अशी या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी सहारनपुरचेच रहिवासी आहेत. तर चौथा आरोपी विकास हा हरियाणाचा आहे. सहारनपुरमध्ये चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हे आरोपी फरार होते. अखेर मिळालेल्या माहितीनंतर हरियाणा आणि उत्तर पोलिसांना त्यांचा सुगावा लागला.
NCP : अमोल कोल्हेंचे 24 तासांत घुमजाव; पवारांना भेटले पण राजीनामा न देताच माघारी फिरले
हरियाणामधील शाहबाद इथल्या एका ढाब्यावर हे आरोपी असल्याची माहिती पोलिसांना गुप्त माहितदारामार्फत मिळाली होती. त्यानंतर वेगाने सुत्र हलवत दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना अटक केलीय. अटक केल्यानंतर आरोपींकडून पोलिसांना कोणतंही शस्त्र मिळालेलं नाही. हरियाणा पोलिसांनी चारही जणांना बेड्या ठोकल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले.
मतदार झोपेत असताना डोक्यात दगड घालण्यासारखंचच काम, बीआरएस नेत्याची सडकून टीका…
28 जून रोजी सहारनपुरमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आझाद समाज पक्ष (कांशीराम) आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण कारमधून जात होते. त्याचवेळी त्यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला. गाडीतून आलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी आझाद यांच्या ताफ्यावर गोळीबर केला.
शिंदे-फडणवीस नवाब मलिकांचा पाठिंबा घेणार? राष्ट्रवादीचे 8 आमदार कुंपनावर
गोळीबारामध्ये चंद्रशेखर आझाद यांच्या कमरेला गोळी चाटून गेली होती. कमरेला गोळी लागल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या गोळीबारात चार राऊंड फायर करण्यात आले होते त्यामुळे वाहनांच्या काचाही फुटल्याचं समोर आलं होतं.
शिंदे गटाचा प्रस्ताव गेला, भाजपाच्या मंत्र्यांची वाढली धाकधूक; राणे-दानवेंची खुर्ची धोक्यात?
प्राणघातक हल्ल्यानंतर आझाद म्हणाले, ज्यावेळी गोळीबार झाला तेव्हा मी माझा भाऊ आणि 5 जण कारमध्ये होतो. एका कार्यक्रमासाठी आम्ही कारमध्ये सहारनपूरला गेलो होतो. कारमध्ये प्रवास करीत असतानाच अचानक गोळीबार झाला. हल्लेखोरांबाबत आता मला व्यवस्थित आठवत नसून माझ्यासोबत असणारे कार्यकर्ते त्यांना ओळखू शकतील, असं ते म्हणाले होते.
दरम्यान, या हल्ल्यानंतर भीम आर्मी आणि एजेजेडी समाज पक्षाच्या समर्थकांकडून आझाद यांना झेड सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली तर दुसरकीडे हा हल्ला का करण्यात आला होता? याचा तपास पोलिस करीत आहेत.