मतदार झोपेत असताना डोक्यात दगड घालण्यासारखंचच काम, बीआरएस नेत्याची सडकून टीका…

मतदार झोपेत असताना डोक्यात दगड घालण्यासारखंचच काम, बीआरएस नेत्याची सडकून टीका…

Balasaheb Sanap News : हे तर झोपेत असताना मतदारांच्या डोक्यात दगड घालण्यासारखंच राजकीय पक्षांचं काम असल्याची टीका भारत राष्ट्र समितीचे नेते बाळासाहेब सानप यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात घडत असलेल्या घडामोडींवर बीआरएसचे नेते बाळासाहेब सानप यांनी सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालंय. यावेळी बोलताना सानप यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करीत राज्यातल्या प्रस्थापित पक्षांवर टीकेची तोफ डागलीय.

BMC Election : आम्ही 150 जागा जिंकणार; फडणवीसांनी सांगितला बीएमसी निवडणुकीचा महिना

सानप म्हणाले, महाराष्ट्राच्या मतदारांनी व्हिजन पाहुन मतदान केलंय, मात्र, मतदारांच्या डोक्यात दगडं घालण्यासारखंच काम राजकीय पक्षांनी केल्याचं ते म्हणालेत. तसेच बीआरएस पक्ष हा भाजपची बी टीम असल्याचा आरोप करण्यात येत होता, पण आता महाराष्ट्राच्या जनतेला पाहिलंय की भाजपची बी टीक कोणती आहे ते, त्यामुळे जनता आता प्रस्थापित पक्षांना वैतागली असून बीआरएसच्या मागे उभी राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

अजित पवारांची शक्ती प्रदर्शनाची तयारी : सर्व पदाधिकाऱ्यांना पाठवला ‘हा’ निरोप

तसेच महाराष्ट्रातल्या गोदावरी नदीचं पाणी हैद्राबादल नेलंय आणि आम्हांला पाच किलोमीटर अंतरावर पाणी मिळत नाही. तेलंगणामध्ये मोफत चोवीस तास लाईट, पाणी मिळतंय हे सर्व पाहुन आता महाराष्ट्राची केसीआर यांच्या मागे उभं राहणार आहे.

भुजबळ, वळसे पाटील, पटेल हे…; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी होकार दर्शवल्यास तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर थेट त्यांना फोन करतील, मुंडेंनी जर बीआरएसमध्ये प्रवेश केला तर त्या राज्याच्या नेत्या होतील आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचंही सूचक विधान सानप यांनी केलंय.

दरम्यान, राज्यात दोन दिवसांपासून अनपेक्षित राजकीय घडामोडी घडताहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवाारांनी आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतलीय. त्यानंतर राज्यात सर्वात मोठा विरोधी पक्ष मानला जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं स्पष्ट झालंय. एवढंच नाहीतर शिवसेनेत जसं बंड झालं अगदी तसंच बंड आता अजित पवारांनी केलं आहे. या मुद्द्यांवर बीआरएस नेते बाळासाहेब सानप यांनी थेट भाष्य करीत सडकून टीका केलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube