अजित पवारांची शक्ती प्रदर्शनाची तयारी : सर्व पदाधिकाऱ्यांना पाठवला ‘हा’ निरोप
Maharashtra politics : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. अजित पवार यांनी मुंबईत खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांची महत्त्वाची बैठक बोलवली आहे. दरम्यान दोन्ही गटाकडून पदाधिकाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. जयंत पाटील यांनी यांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना नोटीसा पाठवल्या आहेत तर आज अजित पवार यांनी संघटनात्मक नियुक्त्यांना सुरुवात केली आहे.
शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी कोणाची या वादाला सुरुवात झाली आहे. दोन्ही गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा केला जातोय. पण अद्याप कोणाकडे किती आमदार आहे हे सांगण्यात आलेले नाही. आता अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शनाची तयारी केली असून उद्या बुधवारी सकाळी दहा वाजता बैठक बोलावली आहे. तसेच उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे मुंबईत उदघाटन ठेवण्यात आले आहे. मंत्रालयासमोरील A/5 बंगला अजित पवारांचे नवे कार्यालय असणार आहे. बाळासाहेब भवनच्या बाजूलाच पक्ष कार्यालय आहे.
अजित पवार सत्तेत येताच शिंदेंच्या अडचणी वाढल्या, मुख्यमंत्री काय भूमिका घेणार?
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन टीम जाहीर केली आहे. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन दूर केले आहे तर जितेंद्र आव्हाडांची विरोधी पक्षनेते म्हणून झालेली नियुक्ती रद्द केली आहे.
‘त्या’ किटी पार्टीला पवारांचं अध्यक्षपद मान्य मात्र पटेल-तटकरेंवरील कारवाई नाही; आव्हाडांचा हल्लाबोल
अजित पवार गटाकडून खासदार सुनील तटकरे यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे. तर सनिल तटकरेंनी देखील नवीन नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर युवक काँग्रेस अध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची नियुक्ती केली. यावेळी प्रदेश प्रवक्ते म्हणून अमोल मिटकरी, आनंद परांजपे, उमेश पाटील, संजय तटकरे आणि सुरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती, तटकरे यांनी दिली.