अजित पवार सत्तेत येताच शिंदेंच्या अडचणी वाढल्या, मुख्यमंत्री काय भूमिका घेणार?

  • Written By: Published:
अजित पवार सत्तेत येताच शिंदेंच्या अडचणी वाढल्या, मुख्यमंत्री काय भूमिका घेणार?

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाच निशाण फडकवलं आहे. अजित पवार यांनी आज (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह अन्य 9 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. राज्यातच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. या घडामोडीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या अडचणीत वाढ झाली आहे.( As soon as Ajit Pawar came to power, Shinde’s problems increased, what role will the Chief Minister take?)

एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यामुळेच महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत हात मिळवणीकरत मुख्यमंत्री झाले. परंतु तेच अजित पवार आता शिंदेंच्या सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

शिवसेना पक्ष फोडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 15 सहकाऱ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. हा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांकडे आहे. शिंदेंसोबत त्यांचे सहकारी अपात्र होणार असल्याच्या चर्चा असल्याने भाजपने अजित पवारांना सोबत घेतल्याचे बोलले जाते.

जर शिंदे अपात्र झालेच नाही. तरी देखील त्याच्या अडचणी वाढल्याचे बोलले जाते. कारण अजित पवार निधी देत नसल्याचे सांगून शिवसेनेचे आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. त्यामुळे आता अजित पवारांसोबत जुळून घेताना शिंदेंची अडचण होणार आहे.

‘त्या’ किटी पार्टीला पवारांचं अध्यक्षपद मान्य मात्र पटेल-तटकरेंवरील कारवाई नाही; आव्हाडांचा हल्लाबोल

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्व्हेनुसार शिंदेंना सर्वात मोठा फटका बसणार असल्याचे समोर आले होते. शिंदेंमुळे याचा फटका भाजपाला देखील बसणार हे सव्हेतून समोर आले होते. त्यामुळे भाजपने शिंदेंना बाजूला करून अजित पवारांना सोबत घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदेची अडचण होताना दिसत आहे.

अजित पवार हे भाजपसोबत आल्याने एक्सनाथ शिंदेंचे महत्व कमी झाल्याचे बोलले जाते. तसेच यामुळे शिंदेंची बर्गेनिग पावर देखील कमी झाल्याचे सांगितले जात आहे. असा आणि अनेक कारणामुळे शिंदेंच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube