Haryana : देशात गो-तस्करांच्या प्रकरणामध्ये अनेकदा वाद होऊन हत्या झालेल्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच दिल्ली-आगरा महामार्गावर गोरक्षकांकडून एका 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या (Haryana Students Murder Case) करण्यात आलीयं. गो-तस्कराचा संशय आल्याने गोरक्षकांनी विद्यार्थ्याच्या कारचा पाठलाग केला, पाठलागानंतर विद्यार्थ्यावर गोळ्या झाडून गोरक्षक पसार झाले. या घटनेत 12 वीत शिकणारा आर्यन मिश्रा याचा नाहक बळी गेलायं.
PAK vs BAN: बांगलादेशने काढली इज्जत, पाकिस्तानचा कसोटी मालिकेत होणार क्लीन स्वीप?
नेमकं काय घडलं?
फरिदाबादमधील आर्यन मिश्रा आपल्या मित्रांसोबत 23 ऑगस्ट रोजी कारमधून जात होता. त्याचवेळी कथित गाय तस्करांचा शोध घेताना गोरक्षकांना एक डस्टर कार समोरुन येताना दिसली. या डस्टर कारमध्ये आर्यन मिश्रा, मित्र, शॅंकी, हर्षित, आणि दोन मुली होत्या. हर्षित गाडी चालवत होता. आर्यन चालकाच्या शेजारील सीटवर बसला होता. त्याचवेळी गोरक्षकांनी हर्षितला गाडी थांबवण्यास सांगितलं मात्र, हर्षित थांबला नाही. शॅंकीचे कोणाशी तरी भांडणे झाले, त्यानंतर हर्षितला मारण्यासाठी गुंड पाठवल्याचं समजून त्यांनी गाडी थांबवली नाही. तेव्हा हर्षितने गाडी दिल्ली-महामार्गावर जवळपास 30 किमीपर्यंत पळवली, अखेर गोरक्षकांनी त्यांचा पाठलाग केला आणि गोळ्या झाडल्या.
मनोज जरांगेंचा सावध पवित्रा; फडणवीसांना गाफील ठेऊन आखणार निवडणुकीची रणनीती..
आर्यनला कुठे गोळ्या लागल्या?
डस्टरचा 30 किलोमीटर पाठलाग केल्यानंतर गोरक्षकांची गाडी जवळ आली. त्यानंतर त्यांनी आर्यनवर गोळ्या झाडल्या, पहिली गोळी आर्यनच्या मानेजवळ लागली. मात्र, दुसऱ्यांदा गोळी झाडली ती गोळी मात्र, आर्यनच्या छातीवर लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
आता टीव्हीवर घरबसल्या बघा ‘बॅड न्यूज!’ विकी कौशल-तृप्ती डिमरीचा सिनेमा ‘या’ ओटीटीवर रिलीज
गाडीत दोन मुली पाहिल्या अन् गोरक्षकांनी पळ काढला…
आर्यनच्या कारचा पाठलाग करुन त्याच्यावर गोळ्या झाडल्यानंतर गोरक्षकांनी गाडीत दोन मुली बसलेलेल्या पाहिल्या. त्यानंतर गोरक्षकांना समजले की हे गो-तस्कर नसून आपण त्यांचा चुकून पाठलाग करीत इथपर्यंत आलो. आर्यनवर गोळ्या झाडल्यानंतर परिस्थितीचं गांभीर्य समजून त्यांनी तिथून पळ काढला.
दरम्यान, फरिदाबादमध्ये काही लोकं गो-तस्करासाठी फिरत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानंतर गोरक्षकांनी शोध मोहिम सुरु केली होती. याचदरम्यान, त्यांनी गाडीचा पाठलाग करुन गोळ्या झाडल्या आणि त्यात 12 वीत शिकणाऱ्या आर्यन मिश्राचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अनिल कौशिक, वरुण, कृष्णा, आदेश आणि सौरभ या पाच आरोपींना अटक केली आहे.