मनोज जरांगेंचा सावध पवित्रा; फडणवीसांना गाफील ठेऊन आखणार निवडणुकीची रणनीती..

मनोज जरांगेंचा सावध पवित्रा; फडणवीसांना गाफील ठेऊन आखणार निवडणुकीची रणनीती..

Manoj Jarange on Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या (Maharashtra Elections) आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनीही चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. आज मनोज जरांगे पाटील पुण्यात होते. येथे आयोजित करण्यात आलेल्या (Pune) बैठकीत त्यांनी पुण्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी संवाद साधला. आगामी काळात काय रणनीती असेल ते आताच उघड करणार नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस लगेच डाव टाकतील, असे जरांगे पाटील म्हणाले.

विधानसभा निवडणुकीबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. आंतरवाली सराटीत बैठक घेऊ तेथे समाजबांधवांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत. पुण्यातील 21 मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. पण काही निर्णय झालेला नाही. काल समाजाचे पुण्यातील सर्व लोक उपस्थित नव्हते. वाद होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्या विचारांचे उमेदवार देणार आहोत. एकही जागा सोडणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

मनोज जरांगेंनी उपसले आमरण उपोषणाचे हत्यार, 29 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार

देवेंद्र फडणवीस खुनशी

निवडणूक लढविण्याबाबत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली. पण निर्णय कोणताही झाला नाही. पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि मग ठरवू की निवडणूक लढवायची की २८८ उमेदवार पाडायचे. सध्या आम्ही रणनीती उघड करणार नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) डाव टाकतील. आमच्याकडे नेते आंतरवलीत येऊन फुकट चहा पिऊन जातात. पण मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. फडणवीसांच्या जवळचे मला येऊन मला गुपचूप भेटतात आणि फडणवीसांची तक्रार करतात. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळं उघड करेन. देवेंद्र फडणवीस खुनशी आहेत. दहशतीने निवडणूक जिंकता येत नाही तर मायेनं जिंकता येणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजपचेच नेते देवेंद्र फडणवीसांचा काटा काढणार, मनोज जरांगेंचा दावा.. 

फडणवीस जादू करतात

मराठवाड्यात पावसामुळे मोठं नुकसान झालंय. पण सरकारकडून मदत मिळत नाही. देवेंद्र फडणवीसशिवाय सरकारमधील पानही हलत नाही. मुख्यमंत्री कुणीही असो निर्णय फडणवीसच घेत आहेत. देवेंद्र फडणवीस हा माणूस मराठा द्वेषी आहे. त्यामुळे सगेसोयरेचा निर्णय होत नाही. देवेंद्र फडणवीस आमचा शत्रू नाही पण, मराठा द्वेष आणि त्यांची वागण्याची पद्धत विचित्र आहे. आठ दहा दिवसांपूर्वी भाजपचे आठ दहा आमदार माझ्याकडे आले त्यांना मी म्हटलं देवेंद्र फडणवीस यांना जाऊन सांगा आरक्षण द्यायला. ते गेले सागर बंगल्यावर गेले आणि परतच आले नाहीत. देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर जादू करतात अशी खोचक टीका जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube