Hathras Stampede : उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras) जिल्ह्यातील फुलराई गावात 2 जुलै रोजी भोले बाबा (Bhole Baba) यांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली होती. या धक्कादायक घटनेत 122 पेक्षा जास्त भाविकांचा मुत्यू झाला होता तर शेकडो भाविक गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणानंतर भोले बाबा फरार झाले असून पोलीस त्यांचा संपूर्ण राज्यात शोध घेत आहे.
तर दुसरीकडे आता या प्रकरणात हाथरस पोलिसांनी (Hathras Police) मोठी कारवाई करत 6 जणांना अटक केली होती. अलिगढ रेंजचे आयजी शलभ माथूर (Shalabh Mathur) यांनी या याबाबत माहिती देताना सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून आतापर्यंत या प्रकरणात 66 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये 4 पुरुष आणि 2 महिला आहे.
अटक करण्यात आलेल्या सर्व लोक भोले बाबांच्या आयोजन समितीत आहे. त्यापूर्वी देखील त्यांनी अनेक कार्यक्रम आयोजन केले होत. त्यांचे मुख्य काम पंडाल लावणं आणि गर्दी जमवणं होता असं शलभ माथूर यांनी सांगितले. याच बरोबर कार्यक्रमाचा मुख्य संयोजक वेदप्रकाश मधुकरवर एक लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे आणि त्याच्या विरोधात एनबीडब्ल्यू जारी करण्यात आला असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
पुढे शलभ माथूर म्हणाले की, आज काही लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास जसाजसा पुढे जाईल तसातसा अधिकारी ठरवणार कोणाला अटक करायची आहे. तसेच या कार्यक्रमासाठी बाबांच्या नावाने परवानगी घेण्यात आली नव्हती अशी माहिती देखील यावेळी शलभ माथूर यांनी दिली.
राहबरी सिंह यादव , उपेंद्र सिंह यादव, हुकूमसिंह, मुकेश कुमार, मंजू यादव आणि मंजू देवी असे अटक करण्यात आलेल्या लोकांची नावे आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 105, 110, 126(2), 223 आणि 238 अंतर्गत या लोकांना अटक करण्यात आली आहे.
प्रकरण काय
2 जुलै रोजी सिकंदरराव कोतवाली भागातील फुलराई गावात भोले बाबाचा प्रवचनाचा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमाला तब्बल 1.25 लाख लोक उपस्थित होते. गर्दीमुळे लोकांचे हाल होऊ लागेल होते त्यामुळे अनेक जण बेहोश होऊ लागले होते तेव्हा ही चेंगराचेंगरी झाली. जेव्हा बेहोश होऊन लोक जमिनीवर पडले तेव्हा इतर लोक त्यांना चिरडून बाहेर येऊ लागले. अशी माहिती समोर आली आहे.
प्रतीक्षा संपली! उद्या लाँच होणार देशातील पहिली CNG Bike, किंमत असणार फक्त …