Download App

बारामुल्लामध्ये दहशतवादी हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल शहीद, घरात घुसून गोळी झाडली

Jammu Kashmir Police : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस कर्मचारी गुलाम मोहम्मद डार हे शहीद झाले आहेत. वेलू क्रालपोरा गावात दहशतवाद्यांनी त्यांच्या घरात घुसून गोळीबार केला. डार हे पोलिसांत हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.

अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गुलाम मोहम्मद डार गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी एसडीएच तांगमार्ग येथे नेण्यात आले होते. गंभीर जखमी झालेल्या डार यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी तीन दिवसांत तिसरी घटना घडवली आहे, तर तीन दिवसांत पोलिसांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. इन्स्पेक्टर मसूर अली यांच्यावर रविवारी श्रीनगरमध्ये हल्ला झाला, ते अजूनही रुग्णालयात आहेत.

अखेर पाकिस्तानने विश्वचषकात विजय मिळवला, बांग्लादेशचा 7 गडी राखून पराभव

मजुराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली
सोमवारी (30 ऑक्टोबर) दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातील मुकेश कुमार यांची पुलवामा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या केली. मुकेश हा मजूर म्हणून काम करायचा. पुलवामाच्या तुची नौपोरा येथे मुकेश भाजी घेण्यासाठी बाजारात गेले असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.

Maratha Reservation : आमदारांचं घर पेटवलं; 27 मराठा आंदोलकांना न्यायालयीन कोठडी

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले होते की मुकेश विणकाम उद्योगाशी संबंधित होते आणि गोळी लागल्याने त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांना सांगितले होते की, धोका अजूनही आहे आणि आपल्याला सतर्क राहावे लागेल.

Tags

follow us