अखेर पाकिस्तानने विश्वचषकात विजय मिळवला, बांग्लादेशचा 7 गडी राखून पराभव
World Cup 2023: विश्वचषकातWorld Cup 2023 : विजयाचा षटकार तरीही संकटात टीम इंडिया; ‘या’ 4 समस्यांचं उत्तर काय? पाकिस्तानने बांग्लादेशचा दारुण पराभव केला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर बांग्लादेशला 7 विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर या विजयानंतर पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम आहेत. बांग्लादेशविरुद्धच्या विजयानंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
पाकिस्तानने आशा जिवंत ठेवल्या…
पाकिस्तानसमोर विजयासाठी 205 धावांचे लक्ष्य होते. पाकिस्तानने 32.3 षटकांत तीन विकेटच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. पाकिस्तानकडून सलामीवीर अब्दुल्ला शफीक आणि फखर जमान यांनी शानदार खेळी केली. अब्दुल्ला शफीक आणि फखर जमान यांच्यात पहिल्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी झाली.
अब्दुल्ला शफीकने 69 चेंडूत 68 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार मारले. तर फखर जमानने 74 चेंडूत 81 धावा जोडल्या. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 7 षटकार मारले. अशा प्रकारे पाकिस्तानने बांग्लादेशचा दारुण पराभव केला.
बांग्लादेशकडून मेहंदी हसन मिराज हा एकमेव यशस्वी गोलंदाज ठरला. मेहंदी हसन मिराजने 9 षटकांत 60 धावांत 3 खेळाडू बाद केले. याशिवाय तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, मुस्तफिझूर रहमान, शाकिब अल हसन आणि नजमुल हुसेन शांटो यांना विकेट मिळाली नाही.
मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचा मार्ग मोकळा; राज्य सरकारकडून GR निघाला
बांग्लादेशी फलंदाजांचा फ्लॉप शो…
बांग्लादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या शाकिब अल हसनचा संघ 45.1 षटकात 204 धावांवर सर्वबाद झाला. बांग्लादेशकडून महमुदुल्लाहने 70 चेंडूत सर्वाधिक 56 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. बांग्लादेशचा कर्णधार शकिब अल हसनने 64 चेंडूत 43 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार मारले. याशिवाय बांग्लादेशच्या उर्वरित फलंदाजांनी निराशा केली.
अशी होती पाकिस्तानची गोलंदाजांची
पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांनी शानदार गोलंदाजी केली. शाहीन आफ्रिदीने 9 षटकांत 23 धावांत 3 खेळाडू बाद केले. तर मोहम्मद वसीम ज्युनियरने 8.1 षटकात 31 धावा देत 3 बळी घेतले. हरिस रौफने 8 षटकात 36 धावा देत 2 खेळाडूंना बाद केले. याशिवाय इफ्तिखार अहमद आणि ओसामा मीरने 1-1 विकेट घेतली.
एका लव्हस्टोरीचा द एन्ड : सचिन पायलट, सारा यांचा घटस्फोट; निवडणूक प्रतिज्ञापत्रातून आले उघडकीस
पाकिस्तानच्या विजयानंतर गुणतालिकेत किती बदल झाला?
मात्र, या विजयानंतर पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचे 7 सामन्यात 6 गुण आहेत. पाकिस्तानने 3 सामने जिंकले आहेत, तर 4 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांग्लादेश संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. बांग्लादेशचे 7 सामन्यांत 2 गुण आहेत. या संघाला केवळ 1 विजय मिळाला आहे, तर 6 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.