World Cup 2023 : पाकिस्तान संघ ठरला फेल! संघात गोंधळ सुरु; इंझमामने दिला राजीनामा

World Cup 2023 : पाकिस्तान संघ ठरला फेल! संघात गोंधळ सुरु; इंझमामने दिला राजीनामा

World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघ म्हणावं तशी कामगिरी करु शकला नाही. पाकिस्तान संघ उपांत्य फेरी गाठण्याचीही शक्यता आता राहिलेली नाही. अशातच आता पाकिस्तान संघात मोठा वाद सुरु असल्याचं समोर आलं आहे. खराब कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेट संघाकडून वादग्रस्त विधाने केली जात आहेत. तर कर्णधार बाबर आझमची खाजगी चॅट व्हायरल झाली आहे. तसेच इंझमाम उल हकनेही राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आरक्षणासाठी भाजप आमदाराचाच पहिला राजीनामा; सत्ताधारी गटात नाराजी वाढली

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि तेजस्वी फलंदाज इंझमाम उक हक हा संघाचा मुख्य निवडक होता. विश्वचषक स्पर्धा सुरु असतानाच इंझमामने हे पद सोडले आहे. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. इंझमामवर अनेक गंभीर आरोपही होत आहेत. या प्रकरणी इंझमामची चौकशीची तयारी सुरू आहे. माझ्यावर प्रश्न उपस्थित झाल्यावर मी राजीनामा दिला तर बरे होणार असल्याचं इंझमामने स्पष्ट केलं आहे.

Sanjay Raut : स्वतःसाठी दिल्ली दौरे सुरु मात्र आरक्षणासाठी…; राऊतांनी शिंदे-फडणवीसांना डिवचलं

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंझमाम उल हक वादात सापडला होता. इंझमामची याझो इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये हिस्सेदारी आहे. या कंपनीचे मालक तल्हा रेहमानी आहेत. रेहमानी सध्या बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन शाह आफ्रिदी यांचे काम पाहतात, जे पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रमुख खेळाडू आहेत. त्यामुळेच इंझमामवर गंभीर आरोप होत आहेत.

‘शिवराय अन् रामदासांच्या नात्याचा पुरावा उपलब्ध नाही’; न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत सुळेंनी सुनावलं

दरम्यान, इंझमामच्या खेळाडूंच्या एजंटच्या कंपनीशी कथित सहभागाची चौकशी सुरू करण्याचे संकेत दिले असल्याची माहितीपाकिस्तान क्रिकेट बोर्ड व्यवस्थापन समितीचे प्रमुख झका अश्रफ यांनी माध्यमांना दिली आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान व दक्षिण आफ्रिकेमध्ये रोमहर्षक लढत झाली. त्यात आफ्रिकेने पाकिस्तानचा एक विकेटने पराभव केला आहे.

Maratha Reservation : शरद पवार गटाचं एक पाऊल पुढं; राज्यपालांना घातलं साकडं

त्याआधीच्या सामन्यात अफगाणिस्तानने बलाढ्य पाकिस्तानला 8 विकेट राखून धूळ चारली. पाकिस्तान संघाने 283 धावांचं लक्ष्य अफगाणिस्तानसमोर ठेवलं होतं. हे लक्ष्य अफगाणिस्तानने 49 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 284 धावांच्या धावांचा बचाव करताना पाकिस्तानच्या प्लेयरने खराब फिल्डिंग केली. सोपे झेल सोडले, त्यामुळे अफगाणिस्तान संघाने सहज विजय मिळवता आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube