Sanjay Raut : स्वतःसाठी दिल्ली दौरे सुरु मात्र आरक्षणासाठी…; राऊतांनी शिंदे-फडणवीसांना डिवचलं
Sanjay Raut On Cm Eknath Shinde : मराठा आरक्षण (Maratha Reservation)मिळावे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. आरक्षणाची समस्या सोडवायची असेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी तातडीने एक विशेष अधिवेशन बोलवावे, ज्या काही घटनात्मक तरतुदी करणं गरजेचं आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकेल असं आरक्षण द्यावं, यासाठी केंद्र सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी महाराष्ट्रातील सरकारला केंद्र शासनावर दबाव आणावा लागेल, असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांना डिवचलं आहे.
Rajkumar Rao: राजकुमार रावने पटकावला ओटीटी परफॉर्मर ‘ऑफ द इयर’ पुरस्कार
श्रीगोंदा येथे शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी खासदार संजय राऊत हे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. यावेळी शिवसेना उपनेते साजन पाचपुते, जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख शरद सूर्यवंशी, नामदेव ताकवणे आदी उपस्थित होते.
आमचे कार्यालय फोडता का?, सरकारी पक्षातील व्यक्तींची ऑफर; जरांगेंचा गौप्यस्फोट
राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस हे राजकीय कामासाठी दिल्ली दौरे करत आहेत. कधी आमदार अपात्रबाबत असो किंवा आपल्या स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाबाबत असो, यासाठी तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना भेटता व स्वतःसाठी तोडगा घेऊन येता. दुसरीकडे मनोज जरांगे आरक्षणासाठी लढाई देत आहे, तर तुम्ही त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला घेऊन जायला हवं आणि प्रधानमंत्र्यांसोबत त्यांची बैठक घ्यावी.
माझं म्हणणं नाही की मोदींनी येथे यावं, मात्र इथं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची विमान दिल्लीकडं उडतच असतात तर एकदा जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्लीला घेऊन जावे. त्यांची परस्थिती खालावत आहे, यामुळे त्यांना तातडीने घेऊन जाऊन आरक्षणावर तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी खासदार संजय राऊत यांनी केली.
आम्ही आरक्षण दिले होते मात्र ठाकरे सरकारला ते टिकवता आले नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली होती. यावर राऊत म्हणाले, फडणवीस हे एक शहाणे गृहस्थ आहे असे आजवर आम्ही समजत होतो मात्र ते तर अतिशहाणे आहे. तुम्ही आता सत्तेत आहात तसेच आरक्षणाचा विषय हा केंद्राचा आहे, तुम्ही एकत्र बसून हा विषय मार्गी लावा. इथं लोक आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही राजकारण करत आहात. आजवर एवढ्या खालच्या स्तराचे राजकारण आम्ही पाहिले नाही, अशी टीका यावेळी संजय राऊत यांनी केली.