World Cup 2023 : विजयाचा षटकार तरीही संकटात टीम इंडिया; ‘या’ 4 समस्यांचं उत्तर काय?

World Cup 2023 : विजयाचा षटकार तरीही संकटात टीम इंडिया; ‘या’ 4 समस्यांचं उत्तर काय?

World Cup 2023 : विश्वचषकात टीम इंडियाची विजयी घोडदौड (World Cup 2023) सुरूच आहे. इंग्लंडचा पराभव करत भारतीय संघाने विजयाचा षटकार लगावला. या स्पर्धेत फक्त भारतीय संघच (Team India)असा आहे ज्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. आता भारताचे आणखी तीन सामने बाकी आहेत. त्यानंतर सेमी फायनलचा टप्पा सुरू होणार आहे. सध्या भारतीय संघ मजबूत दिसत असला तरी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) काही समस्या भेडसावत आहेत. या समस्या संघातील चार खेळाडूंशी संबंधित आहेत. कारण भारतीय संघ चांगली कामगिरी करत असला तरी हे यश फक्त एकट्याचेच नाही तर ही सांघिक कामगिरी आहे.

रोहित शर्माच्या कप्तानीत संघ जोरदार कामगिरी करत आहे. संघ गुणतालिकेत टॉपवर आहे. रोहित शर्मा जे काही निर्णय घेत आहे ते यशस्वी ठरत आहेत. मात्र तरीही अशी परिस्थिती निर्माण होऊ नये ज्यामुळे रोहित शर्मापुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. परंतु, तशी परिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामागे काही कारणेह आहेत. त्याची माहिती जाणून घेऊ या..

World Cup 2023 : पुन्हा दे धक्का, अफगाणिस्तानकडून लंकेचे ‘वस्रहरण’…

शुभमन गिलची सुमार कामगिरी 

भारताचा स्टार सलामीवीर खेळाडू शुभमन गिलची बॅट सध्या शांत आहे. या स्पर्धेत त्याची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे. दुखापतीतून सावरून त्याने संघात कमबॅक केले. मात्र,  त्याचे पुनरागमन संघासाठी अजून तरी फायद्याचे ठरलेले नाही. या स्पर्धेत शुभमनने आतापर्यंत चार वेळेस फलंदाजी केली आहे. यात त्याने फक्त एकच अर्धशतक केले आहे. इतर सामन्यात त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आगामी सामन्यातही अशीच कामगिरी सुरू राहिल्यास संघासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सिराजची गोलंदाजीची धार गायब

या स्पर्धेत टीम इंडियाची घातक गोलंदाजीची चर्चा होत आहे. गोलंदाजीच्या जोरावरच संघाने मोठी कामगिरी केली आहे. शमी, बुमराह, कुलदीप यादव यांच्या गोलंदाजीत धार दिसून येत आहे. परंतु, वेगवान गोलंदाज सिराज मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. आशिया कपमध्ये सिराजने घातक गोलंदाजी करत संघाला अनेक सामने जिंकून दिले होते. तशी कामगिरी त्याला विश्वचषकात अजून तरी करता आलेली नाही. सिराजने सहा सामन्यात फक्त सहा विकेट घेतल्या आहेत. त्याच्या गोलंदाजीत पहिल्यासारखी धार दिसून येत नाही. ही संघासाठी धोक्याची बातमी ठरू शकते.

World Cup 2023 : पाकिस्तान संघ ठरला फेल! संघात गोंधळ सुरु; इंझमामने दिला राजीनामा

हार्दिक पांड्या थेट सेमीफायनलमध्येच दिसेल

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे संघाची बाजू थोडी कमकुवत झाली आहे. बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होती. तो सध्या बंगळुरू येथील अकादमीत उपचार घेत आहे. तो विश्वचषकात पुन्हा परतेल का याची निश्चित माहिती अजून तरी मिळालेली नाही. पण, हार्दिक आता थेट सेमी फायनल्सच्या  सामन्यात खेळेल असे सांगण्यात येत आहे. म्हणजेच पुढील तीन सामन्यात तो दिसणार नाही. त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादव, इशान किशन या खेळाडूंना संधी दिली जात आहे.

श्रेयस अय्यरची कमजोरी कायम 

श्रेयस अय्यरला संधी मिळाली होती. मात्र त्याला त्याचा फायदा घेता आला नाही. न्यूझीलँड आणि इंग्लँडच्या सामन्यात तो अडखळत खेळताना दिसला. शॉर्ट पिच चेंडूंवर बाद होताना दिसला. त्यामुळे त्याची आधीची कमजोरी अजूनही कायम असल्याचे दिसून आले. विश्वचषक स्पर्धेत अय्यरने आतापर्यंत सहा सामन्यात खेळला आहे. या सामन्यात फक्त एकच अर्धशतक त्याला करता आले. त्यामुळे त्याची कमजोरी टीम इंडियासाठी टेन्शन देऊ शकते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube