नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research), गेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy), भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market) आणि भारतीय उद्योगविश्वासह भारतीय राजकीय पटलावर यावर घेतले जाणारे नाव. याच नावाने गौतम अदानी (Gautam Adani) यांच्याबरोबर केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणीत NDA सरकारला मोठा झटका देण्यात आला.
हिंडेनबर्ग रिसर्च संस्था आता प-रत एकदा मोठ्या प्रमाणात चर्चेत आली. हिंडेनबर्ग रिसर्चने नुकतीच माहिती दिली आहे की, ते आता लवकरच आजून एक नवा अहवाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हिंडेनबर्ग संस्थेच्या या माहितीने भारताबरोबरच जगभरातील उद्योजक, राजकारणी आणि उद्योग विश्वात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. हिंडेनबर्ग आता नेमकं कोणावर निशाणा साधणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली.
हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेचा अहवाल आला आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला जोरदार मोठा झटका बसला. भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली. परिणामी गौतम अदानी यांची सप्टेंबर २०२२ मध्ये असलेली १५० अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती अवघ्या ५३ अब्ज डॉलर्सवर येऊन थांबली आहे. इतकेच नव्हे तर जगात सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरअसलेले अदानी थेट आता ३५ व्या क्रमांकावर ढकलले गेले आहेत. ही घसरण आजूनही सुरुच आहे.
हिडेनबर्गने हे संशोधन २४ जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. हा इतिसाह असताना देखील हिंडेनबर्गने माहिती दिली. लवकरच ते नवीन अहवाल प्रसिद्ध करत आहेत. हिडेंनबर्ग यांनी केलेल्या या घोषणेमुळे भारताबरोबरच जगभरात अनेक उद्योगजक आणि उद्योग समूहांच्या पोटात भीताचा गोळा निर्माण झाला आहे. हिंडेनबर्ग आता नेमकं कोणावर निशाणा साधणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
गौतम अदानी यांना लक्ष्य केंद्रित केल्यानंतर हिंडेनबर्ग रिसर्चने २३ मार्च रोजी ट्विट करत त्याबद्दलची माहिती देताना म्हटले आहे की, लवकरच ते नवीन एक नवा अहवाल प्रसिद्ध करत आहेत. आता कोणता उद्योग समूह हिंडेनबर्गच्या निशाण्यावर असणार याबाबत जगभरात सर्वाना उत्सुकता लागली आहे.
हिंडनबर्ग रिसर्च ही एक मोठी गुंतवणूक संशोधन संस्था आहे. जिने सर्वांकरिता व्यापार केलेल्या कंपन्यांवर गंभीर अहवाल प्रकाशित केले. यामधून या संस्थेने मोठी प्रसिद्धी मिळवली. या फर्मची स्थापना २०१७ मध्ये झाली. तेव्हापासून आरोग्यसेवा, तंत्रज्ञान आणि वित्त याबरोबरच विविध उद्योगांमधील कंपन्यांद्वारे फसवणूक आणि गैरवर्तन केल्याचा आरोप असलेले नवीन अहवाल प्रकाशित करण्यात आले आहेत.
हिंडनबर्ग रिसर्च ज्या कंपन्यांचा अहवाल देतो, या कंपन्यांवर शॉर्ट पोझिशन्स घेण्यासाठी ओळखले जाते. याचा अर्थ कंपनीच्या स्टॉकची किंमत कमी झाल्यावर नफा होतो. फर्म निकोला कॉर्पोरेशन आणि क्लोव्हर हेल्थ इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या अहवालांबरोबरच अनेक मोठी प्रोफाइल प्रकरणांमध्ये सहभागी आहे. हिंडेनबर्गच्या अहवालांव त्यांच्या अचूकतेवर आणि त्यांच्या काही हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काही लोकांकडून टीकेचा सामना करावा लागला.