Hindenburg Research : हिंडेनबर्गचा मोठा धमाका, अदाणीनंतर ट्विटरच्या माजी संस्थापकावर केले धक्कादायक आरोप

Hindenburg Research : अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ (Hindenburg Research) संस्थेने अदाणी उद्योग समूहामधील (Adani group Stocks) कथित गैरप्रकारांवर गेल्या काही दिवसात अहवाल जाहीर केला. यानंतर भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात धमाका झाला आणि अदाणी समूहाचे समभाग मोठ्या प्रमाणात कोसळला. तसेच, अदाणी समुहाची संपत्ती निम्म्याहून कमी झाली. यामुळे आता ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ संस्थेने आणखी एका धमाका केला. हिंडेनबर्गने आता […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (89)

Hindenburg Research

Hindenburg Research : अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ (Hindenburg Research) संस्थेने अदाणी उद्योग समूहामधील (Adani group Stocks) कथित गैरप्रकारांवर गेल्या काही दिवसात अहवाल जाहीर केला. यानंतर भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात धमाका झाला आणि अदाणी समूहाचे समभाग मोठ्या प्रमाणात कोसळला. तसेच, अदाणी समुहाची संपत्ती निम्म्याहून कमी झाली. यामुळे आता ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ संस्थेने आणखी एका धमाका केला. हिंडेनबर्गने आता ट्विटरचे संस्थापक आणि सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांच्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालामध्ये जॅक डोर्सी यांच्या पैशांची देवाण- घेवाण करणारी कंपनी ‘ब्लॉक इंक’वर ( Block Inc ) फसवणुकीचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. ब्लॉक इंकने आपले वापरकर्ते वाढवून दाखवल्याचा हिंडेनबर्गने यावेळी सांगितलं आहे. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यावर ब्लॉक इंकच्या शेअर्समध्ये १८ टक्क्यांनी घसरण झाली.

पंतप्रधान मोदींच्या कमी झोपण्यावरुन केजरीवालांनी उडवली खिल्ली

अहवालात मोठा खुलासा

हिंडेनबर्गने यांनी सांगितलं आहे की, २ वर्षांच्या तपासानंतर हा अहवाल बनवण्यात आला आहे. ब्लॉक इंकने तंत्रज्ञानांच्या मदतीने मोठा घोटाळा केला. तसेच, कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांच्या दाव्यानुसार ४० ते ७५ टक्के खाती बनावट असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. एकाच व्यक्तीशी संबंधित हे सर्व खाते आहेत. कंपनीने सतत गुंतवणूकदारांची दिशाभूल केली असल्याचे हिंडेनबर्गनं यांनी यावेळी सांगितल.

दरम्यान, ‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या अहवालावर अदानी उद्योग समूहाचे समभागांमध्ये झालेल्या मोठ्या पडझडीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, बाजार नियामक ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ला  २ महिन्यांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहे.

Exit mobile version