Download App

Crime : आधी मेसेज आला, नंतर अश्लील व्हिडिओ सुरु झाला त्यानंतर खंडणीचं सत्र…

Honey Trap : हनीट्रॅप प्रकरणी सायबर गुन्हेगारांनी दिल्लीतल्या एका 75 वर्षीय व्यक्तीला 7 लाख 34 हजारांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. सायबर गुन्हेगारांनी अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याची तक्रार पीडित व्यक्तीने दिल्ली पोलिसांकडे दिली आहे.

फडणवीसांच्या पीएने निधी आणला; भाजप आमदाराने थेट राजीनाम्याचा इशारा दिला

सायबर गुन्हेगारांनी पीडित व्यक्तीसोबत सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ, चॅट करुन त्यांच्याकडे खंडणी मागितली आहे. 15 जानेवारी रोजी एका महिलेचा त्यांना सोशल मीडियावर मेसेज आला होता. त्यानंतर कथित अकाऊंटवरु त्यांना व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल केल्यानंतर त्यामध्ये अश्लील अवस्थेत समोरील व्यक्ती होती. त्यानंतर काही मिनिटांतच कॉल बंद झाला.

अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्‍यांना मारहाणप्रकरणी पुणे महापालिकेसमोर आंदोलन

त्यानंतर दोन दिवसांनंतरच त्यांना एक मॉर्फ केलेला अश्लील व्हिडिओ शेअर करत खंडणी मागितली. खंडणीमध्ये जर 61,000 रुपये दिले नाहीत तर अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी लगेचच नंबर ब्लॉक केला. दरम्यान, या प्रकरणी त्यांनी तीन वेळा सायबर गुन्हेगारांना 7 लाख 34 हजार रुपये दिले असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=VdbU2GagpB0

अशा घटनांमध्ये फसवणूक करणारे महिलांचे रेकॉर्डेड अश्लील व्हिडिओंचा वापर करुन ते प्ले करतात. त्यानंतर लोकांना वाटतं की, महिलेचा फोन आला आहे. त्याननंतर त्या महिला लोकांना नग्न होण्यास सांगतात. हा सर्व अश्लील प्रकार ते रेकॉर्ड करतात. पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणार असल्याची धमकी दिली जाते. त्यामुळेच लोकं घाबरुन पैसे देत असल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us