अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्यांना मारहाणप्रकरणी पुणे महापालिकेसमोर आंदोलन
strike against Pune Street Vendors : मंगळवारी पुण्यातून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली होती. अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या सुरक्षा रक्षकाला जमावाने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला. रस्त्यावरील अनाधिकृत फेरीवाले यांच्याविरुद्ध कारवाई सुरू असताना ही मारहाण करण्यात आली.
पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणार्या कैलास स्मशानभूमी ते आरटीओ दरम्यान अतिक्रमण कारवाई करतअसताना पालिका कर्मचाऱ्याना फेरीवाल्यांकडून मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारसमोर अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांच्या नेतृत्वाखाली पालिका कर्मचारी यांनी आंदोलन केले .
जातीय दंगलीला राणे कारणीभूत…ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा आरोप
यावेळी माधव जगताप म्हणाले की, आमचे अधिकारी, कर्मचारी हे कैलास स्मशानभूमी ते आरटीओ दरम्यान अनधिकृत फेरीवाल्यां विरोधात कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी आमच्याच कर्मचार्यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत असून संबधित फेरीवाल्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी. तसेच आमच्या कर्मचार्यांना कारवाई दरम्यान अधिकचा पोलिस बंदोबस्त दिला जावा. अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदू कुंभकर्णाचे बाप…; कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या विजयावरुन शरद पोंक्षे आक्रमक