हिंदू कुंभकर्णाचे बाप…; कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या विजयावरुन शरद पोंक्षे आक्रमक

हिंदू कुंभकर्णाचे बाप…; कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या विजयावरुन शरद पोंक्षे आक्रमक

Sharad Ponkshe Tweet : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections)कॉंग्रेसनं (Congress) बाजी मारली आहे. कॉंग्रेसनं कर्नाटक विधानसभेत 135 जागा निवडून आल्या आहेत. कॉंग्रेसने भाजपला (BJP)चांगलीच धोबीपछाड दिली आहे. या निवडणुकीत भाजपला फक्त 66 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सुप्रीम कोर्टाला मिळणार दोन नवे न्यायाधीश! कॉलेजियमकडून ‘या’ दोन नावांची शिफारस

विशेष म्हणजे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विविध मुद्द्यांवरुन हिंदू मतदारांना साद घातली आहे. यामध्ये अगदी हिजाब बंदीपासून बजरंग बली, बजरंग दल आणि मुस्लिम आरक्षण हटवणे अशा विविध मुद्द्यांचा समावेश होता, असं असलं तरी या निवडणुकीत धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाचे मुद्दे फारसे न चालल्याचे निवडणुकीच्या निकालावरुन दिसून आले.

यावरुन अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटंय की, असं वाटत हिंदू कुंभकर्णाचे बाप आहेत. जागेच होत नाहीत, असं त्यांनी म्हटलंय.

पोंक्षे यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांची ही प्रतिक्रिया कर्नाटक निवडणुकीशी जोडली जात आहे. पोंक्षेंच्या या ट्वीटवर अनेकजणांनी प्रतिक्रिया देत आहेत. यावर शिवसेनेशी संबंधित अनुज म्हात्रे नावाच्या ट्वीटर युजरने शरद पोंक्षेंना उद्देशून म्हटलंय की, अच्छा म्हणजे जनतेने कॉंग्रेसला निवडून दिलं तर ते झोपलेले हिंदू? नशीब देशद्रोही म्हटलं नाही.

या ट्वीटबरोबर शरद पोंक्षे यांनी एक ट्वीट केलं आहे, त्यामध्ये त्यांनी एका मुस्लीम नेत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. संबंधित मुस्लिम नेता कर्नाटकच्या मंत्रिमंडळात मुस्लिम नेत्यांना महत्वाची पदं द्यावीत आणि कर्नाटकचा उपमुख्यमंत्री मुस्लिम असावा, अशी मागणी देखील करत आहे.

हा व्हिडीओ शेअर करत असताना शरद पोंक्षेंनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, हिंदूंनो अजूनही जागे व्हा, वेळ गेली नाही. कॉंग्रेसला निवडून दिल्याची परतफेड म्हणून काय मागतायत पाहा. जागे व्हा हिंदूंनो… असं लिहिलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube