How Much Wealth of Home Minister Amit Shah : लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah) यांनी एनडीएकडून गुजरातमधील गांधीनगर लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या संपत्तीबद्दल ( Wealth ) माहिती दिली. जी माहिती देणे उमेदवाराला बंधनकारक असते. त्यातून देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांकडे किती संपत्ती आहे? हे लोकांच्या समोर आले आहे. मात्र ही संपत्ती पाहुन तुम्ही आवाक् व्हाल चला तर जाणून घेऊ अमित शाहंची संपत्ती कीती आहे?
शुक्रवारी एकीकडे देशात लोकसभा निवडणुकांसाठी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. तर दुसरीकडे हे मतदान होत असताना देश भरात अनेक उमेदवार दुसऱ्या टप्प्यात होण्याऱ्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत होते. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनडीएकडून गुजरातमधील गांधीनगर लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामध्ये त्यांनी आपल्याकडे असलेल्या संपत्तीची देखील माहिती दिली.
अमित शाहंकडे स्वतःची कार देखील नाही…
अमित शाह यांनी दिलेल्या त्यांच्या संपत्ती बद्दलच्या माहितीने ते सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. याचं कारण म्हणजे त्यांनी आपल्या विवरण पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे स्वतःची कार देखील नाही. शेती हा त्यांचा व्यवसाय असून ते एक सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. तसेच त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत हे संसदेतील वेतन, घर आणि जमिनीतून येणार भाडं, शेतीतील उत्पन्न आणि शेअर डेव्हिडंट हे आहेत. त्याचबरोबर यामध्ये त्यांनी त्यांच्यावर तीन गुन्हे देखील दाखल असल्याचं सांगितलं आहे.
तर अमित शाहंच्या संपत्तीमध्ये 20 कोटींची जंगम आणि 16 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. तसेच त्यांच्याकडे केवळ 24,164 रुपयांची नगद रक्कम असून 15 लाख 77 हजारांचं कर्ज आहे. त्यांच्याकडे 72 लाखांचे दागिने आहेत. त्यातील 8 लाख 76 हजाराचे दागिने त्यांनी स्वतः खरेदी केलेले आहेत. त्यांच्या पत्नीकडे 1 कोटी 10 लाखांचे दागिने आहेत. ज्यामध्ये 1620 ग्रॅम सोनं आणि 63 कॅरेट हिऱ्यांचे दागिने आहेत. तर त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं अनुक्रमे वार्षिक उत्पन्न हे 75 लाख 9 हजार आणि 39 लाख 54 हजार एवढं आहे. अशी माहिती शाह यांनी दिली आहे.
ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित शाह यांनी माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: गांधीनगर या मतदारसंघातील मतदार आहेत. त्या गांधीनगरमधून मी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी यावेळी दिली. तसंच, या मतदार संघाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी पाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी नेतृत्व केलं आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असंही शाह यावेळी म्हणाले.