Rahul Gandhi On NDA : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) यश मिळाल्यानंतर अखेर एनडीएने (NDA) देशात सत्ता स्थापन केलीयं. या निवडणुकीत एनडीएच्या अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने नितीश कुमार यांचा जनता दल आणि चंद्राबाबू नायडू टीडीपी पक्षाशी युती करावी लागली. त्यानंतरच एनडीएने देशात सत्ता स्थापन करण्यास एनडीएला यश मिळालंय. निवडणुकीच्या निकालानंतर आज लोकसभेच्या कामकाजास सुरुवात झाली. कामकाजाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एनडीएवर हल्लाबोल चढवत एनडीएच्या बॅकफुटची दहा कारणे सांगितली आहेत.
दरवेळी संसदेच्या पायऱ्या चढताना जाणीव ठेव; दिल्ली गाजवण्यापूर्वी सुळेंनी सांगितला पवारांचा कानमंत्र
राहुल गांधी म्हणाले, देशात मागील काही दिवसांत अनेक घटना घडल्या आहेत. त्यामध्ये रेल्वे दुर्घटना, काश्मीर आतंकवादी हल्ला, नीट घोटाळा, नीट पीजी प्रकरण, युजीसी नेट पेपर लीक प्रकरण, दुध, डाळ, गॅस, टोल, पाणीप्रश्न, अशा प्रश्नांमुळे एनडीए सरकारला बॅकफुटवर गेलं असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलंय. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा संविधानावर हल्ला करीत आहेत, संविधानावरील हल्ला आम्हाला मान्य नसून आम्ही असं होऊ देणार नसल्याचंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस पहिल्या 15 दिवसांतच अनेक गोष्टींची कमतरता दिसून आली असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज लोकसभेच्या कामकाजास सुरुवात झाली. कामकाजाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरि महताब यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिलीयं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शपथ घेतलीयं. त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि खासदारांनाही शपथ दिलीयं.
देशात सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकारची स्थापना झाली असून लोकसभेच्या कामकाजाच्या पहिल्याच सत्रात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलं जाणार असल्याचं दिसून येत आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून नीट परिक्षा घोटाळा ते महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारला चांगलच घेरलं जाणार असल्याची शक्यता आहे.
गिरीराज सिंह-वेणुगोपाल यांची गळाभेट…
संसदेच्या कामकाजाला सुरुवात होण्याआधी सर्वच खासदार काही वेळासाठी संसदेच्या बाहेर आले होते. त्याचवेळी संसेदच्या पायऱ्या चढताना काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल आणि भाजपचे खासदार के. सुरेश एकमेकांशी चर्चा करीत होते. त्याचवेळी भाजपचे खासदार आणि मंत्री गिरीराज सिंह यांनी मागच्या बाजूला येत वेणुगोपाल यांची गळाभेट घेतली. याचवेळी काही खासदारांमध्ये चर्चा सुरु होती.