Download App

“काठ्यांनी मारलं, सात दिवस तुरुंगातील अन्न खाल्लं”, अमित शाहांनी सांगितला काँग्रेस राजवटीतील ‘कटू’ प्रसंग

आसाममध्ये काँग्रेसचे सरकार असताना मला मारहाण झाली. सात दिवस तुरुंगातील जेवण खावं लागलं असे अमित शाह म्हणाले.

Amit Shah Criticized Congress : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सध्या आसाम राज्याच्या दौऱ्यावर आहेत. शाह यांनी डेरगांव येथील लचित बरफुकन पोलीस अकादमीच्या उद्घाटन कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी आयोजित सभेत त्यांनी केलेल्या वक्तव्याची देशभरात चर्चा होत आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री असताना हितेश्वर सैकिया यांनी केलेल्या अटकेची आठवण सांगितली. आसाममध्ये काँग्रेसचे सरकार असताना मला मारहाण झाली. सात दिवस तुरुंगातील जेवण खावं लागलं असे अमित शाह म्हणाले.

अमित शाह पुढे म्हणाले, काँग्रेसने आसाममध्ये कधीच शांतता राहू दिली नाही. काँग्रेस सरकारच्या काळात आसाममध्ये मला सुद्धा मारहाण झाली होती. हितेश्वर सैकिया मुख्यमंत्री असताना आम्ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत असायचो. मी सुद्धा आसामात सात दिवस त तुरुंगातील अन्न खाल्लं होतं. आसामला वाचविण्यासाठी तेव्हा संपूर्ण देशातून लोक आले होते. आज हाच आसाम विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे.

हितेश्वर सैकिया सन 1983 ते 1985 आणि 1991 ते 1996 या काळात दोन वेळेस मुख्यमंत्री राहिले होते. अमित शाह म्हणाले की आसामची लचित बर्फुकन पोलीस अकादमी पुढील पाच वर्षांत देशातील सर्वोच्च पोलीस अकादमी बनेल. या पोलीस अकादमीचे उद्घाटन गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वासरमा आणि केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल उपस्थित होते.

अमित शाहंची बैठक, आतिशींचा राजीनामा..दिल्लीत सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

follow us