IDBI Bank : एक मोठी बातमी समोर आली आहे. (Nirmala Sitharaman) आता आणखी एक सरकारी बँक विक्रीच्या मार्गावर आहे, याचा अर्थ सरकार त्यात निर्गुंतवणूक करून तिचं खाजगीकरण करू शकते. दरम्यान, देशाचा अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी (IDBI) सादर होणार आहे. त्याअगोदरच ही बातमी आली आहे.
अर्थसंकल्प RBI Rules: आरबीआयकडून नियमात मोठे बदल; कर्जदारांना दिलासा, बँकांना पाठवल्या सूचना
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ही निर्गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संभाव्य मंजुरी दिली आहे. अशा परिस्थितीत सरकार अर्थसंकल्पातच याबाबत मोठी घोषणा करू शकते. तसंच, रिझर्व्ह बँकेने IDBI बँकेच्या निर्गुंतवणुकीत भाग घेणाऱ्या बोलीदारांना संभाव्य मान्यता दिली आहे. अशा परिस्थितीत आता सर्वांचं लक्ष 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाकडं लागलं आहे.
भागभांडवल विकू शकतात शिखर बँक घोटाळ्यात क्लीनचीट मिळणं हाच एक घोटाळा ; संजय राऊतांचा घणाघात
IDBI बँकेच्या निर्गुंतवणुकीची योजना मोदी सरकारने मे 2021 मध्येच तयार केली होती. तेव्हापासून आजपर्यंत सरकार फक्त भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बोली लावणाऱ्यांसाठी मंजुरीची वाट पाहत होते. दरम्यान, बिझनेस स्टँडर्डने दावा केला आहे की, आरबीआय सर्व बोली लावणाऱ्या कंपन्यांची अंतिम पडताळणी प्रक्रिया करत आहे. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानंतर, सरकार IDBI बँकेतील बहुसंख्य भागभांडवल विकू शकते. आरबीआयकडे 4 संभाव्य खरेदीदारांचे प्रस्ताव आहेत. सूत्रांच्या माहितीप्रमाणे, यापैकी तिघांना आरबीआयची मंजुरी मिळू शकते.